Hot Posts

6/recent/ticker-posts

ध्येयवेढ्या वाचकाने आयोजित केले साने गुरुजी विचार साहित्य संमेलन

 ध्येयवेढ्या वाचकाने आयोजित केले साने गुरुजी विचार साहित्य संमेलन

पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-साहित्य संमेलन म्हटलं की, प्रचंड डामडौल, वायफळ खर्च  आणि रुसवे फुगवे...!  परंतु संतोष चौंडावार, पंढरपूर  या ध्येयवेढ्या वाचकाने   विविध वर्तमानपत्रात लेखन करणाऱ्या नवोदित  लेखकांशी संपर्क साधून, त्यांना  आमंत्रित  करत स्वतःच्या  मातोश्री कै. विमल ज्ञानेश्वर चौंडावार यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी विचार साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. वाचन संस्कृती वाढली पाहिजे, नवोदित लेखकांना प्रोत्साहित केले पाहिजे  आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत  सदर साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. सोमवार दि. १० जून २०२४ रोजी प.पू.राऊळ महाराज मठ, केंद्रे महाराज मठासमोर,सांगोला चौक, पंढरपूर येथे हे साहित्य संमेलन सकाळी १० ते दुपारी ३  या वेळेत संपन्न होणार असल्याचे  संतोष चौंडावार यांनी सांगितले आहे . साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उदगीर चे साहित्यिक  धनंजय गुडसुरकर हे भूषवणार भूषवणार आहेत.  एकदिवसीय साहित्य संमेलनात पाच  परिसंवादांचे  आयोजन केले आहे. साहित्य संमेलनाच्या  स्वागतध्यक्षा पंढरपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले या आहेत.

    पहिल्या सत्रात  ' शिकवण संतांची ',या विषयावर पहिला परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात   आनंद घोडके,(अध्यक्ष, काव्यप्रेमी शिक्षक मंच, सोलापूर), प्राचार्या डॉ.नसीमा पठाण,( संत साहित्याच्या अभ्यासिका,  सोलापूर) ह.भ.प. विनय महाराज बडवे हे सहभागी होणार आहेत. 

       दुसरा परिसंवाद   'आई श्यामची व आजची' या विषयावर होणार आहे. या परिसंवादात सौ. कविता  हिंगमिरे (लेखिका, माळशिरस),सौ. रश्मी  कौलवार (लेखिका, पंढरपूर), सौ. विणा व्होरा (लेखिका, पंढरपूर),मा. श्रुती वडकबाळकर ( ज्येष्ठ साहित्यिका,  सोलापूर)या सहभागी होणार आहेत.

         दुपारच्या सत्रात तिसरा परिसंवाद 'वाचन संस्कृती  कशी वाढेल ?' या विषयावर होणार आहे. यामध्ये राजेंद्र उगोले (लेखक, नाशिक)शाम ठाणेदार (लेखक, दौंड). रमेश वाघ (लेखक, नाशिक )हे सहभागी होणार आहेत.

    चौथा परिसंवाद 'नीती मूल्यांचा -हास आणि साहित्यिकांची जबाबदारी...' या विषयावर

होणार आहे. यामध्ये  महेश कोळेकर (लेखक, सोलापूर), किशोर जाधव (लेखक,सोलापूर), अॅड. दिलिप कांबळे (लेखक,उस्मानाबाद) सहभागी होणार आहेत.

    पाचवा परिसंवाद ' लेखक वाचक एक अतूट नाते...' या विषयावर होणार आहे. यामध्ये सौ.वंदना कुलकर्णी (लेखिका, सोलापूर), सौ. उज्वला शिंदे (लेखिका, भंडीशेगाव), सौ. शशिकला

गुंजाळ (लेखिका, वाशी) या सहभागी होणार आहेत.

       साहित्य संमेलनास सौ. सविता कुरुंदवाडे ( लेखिका, पुणे), सौ. आशा पाटील (लेखिका,पंढरपूर )सौ. संध्या धर्माधिकारी (लेखिका, सोलापूर),नवनाथ शिंदे (लेखक, अरण),  गिरीष दुनाखे ( लेखक, सोलापूर), सौ. वैशाली सुर्यवंशी (लेखक,नाशिक), कु. छाया उंब्रजकर (लेखिका, सोलापूर),सौ. अस्लेषा मोदी (लेखिका, सांगोला), सौ. स्वाती गांधी (लेखिका, पुणे), सौ.पुजा पांडे (लेखिका, मुंबई), सौ. प्रिया कौलवार (लेखिका) या साहित्यिकांची प्रमुख उपस्थिती

राहणार आहे.

     तरी साहित्य संमेलनास साहित्यप्रेमीने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आव्हान स्वागताध्यक्षा सौ. साधनाताई भोसले आणि आयोजक संतोष चौंडावार यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments