माढ्याच्या तहसीलदारांच्या विरोधात पती पत्नीचं अवैध वाळू प्रश्नी अनोखं आंदोलन,तहसीलदारांच्या टेबलवर खोर्या पाटी ठेऊन केले गांधिगिरी आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 8, 2024

माढ्याच्या तहसीलदारांच्या विरोधात पती पत्नीचं अवैध वाळू प्रश्नी अनोखं आंदोलन,तहसीलदारांच्या टेबलवर खोर्या पाटी ठेऊन केले गांधिगिरी आंदोलन

 माढ्याच्या तहसीलदारांच्या विरोधात पती पत्नीचं अवैध वाळू प्रश्नी अनोखं आंदोलन,तहसीलदारांच्या टेबलवर खोर्या पाटी ठेऊन केले गांधिगिरी आंदोलन 




माढा (कटूसत्य वृत्त);-सीना नदीतून होत असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपशा प्रश्नी माढ्यात तहसीलदारांच्या विरोधात अनोखं आंदोलन पार पडले.वारंवार तक्रारी देऊन देखील तहसीलदार वाळू तस्करांविरोधात कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ दारफळ च्या अभिजीत साठे,ज्योती साठे या पती पत्नीने तहसीलदार विनोद रणवरे यांच्या टेबलवर खोर्या पाठी ठेऊन गांधिगीरी पद्धधतीने आंदोलन केले.
अवैध वाळू उपशाला माढ्याच्या तहसीलदारांचे अभय असल्याचा आरोप करीत दिवस-रात्र वाळू उपसा सुरू असताना तहसील प्रशासन सपशेल दुर्लक्ष करीत आहे.येत्या ८ दिवसांत वाळू तस्कराविरोधात कारवाई न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी आंदोलन कत्याॅ साठे दाम्पत्याने दिला.सीना नदीतून होत असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपश्या प्रश्नी तहसीलदारांना वेळोवेळी तक्रारी देऊनही दुर्लक्ष करीत असुन साठे दाम्पत्याने पोलिस स्टेशन, तहसील प्रशासनास निवेदन दिले होते.
त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास तहसील कार्यालयात ज्योती साठे,अभिजीत साठे या दाम्पत्याने हातात खोर्या घेऊन प्रवेश केला.तहसीलदार कक्षात तहसीलदार विनोद रणवरे उपस्थित नसल्याने साठेनी तहसीलदार यांच्या टेबलवर खोर्या पाटी पुजा करुन ठेवली.हा प्रकार पाहुन तहसील प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणुन उपस्थित झालेले नायब तहसीलदार श्री. भडकवाड हे देखील पाहतच राहिले.
वाळु माफियांना तहसील प्रशासन सहकार्य करीत असल्याबद्द्ल गांधिगिरी करीत भडकवाड यांचा सन्मान करुन बेकायदा वाळु माफियांवर कारवाई करावी अन्यथा दर आठवड्याला आंदोलन सुर राहतील.असा गर्भित इशारा देखील लेखी निवेदनातुन देण्यात आलाय.आंदोलन सुरु असताना तहसील कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कोट) मी आणी माझ्या पत्नीने सीना नदीतील वाळू उपशा प्रश्नी तक्रारी दिलेल्या आहेत.मला तक्रारी मागे घे आंदोलन करु नको.दबाव टाकले जात आहेत.तु तक्रारी मागे घेतल्या नाहीत तर तुझी समाजात पैसै मागत आहे.म्हणून बदनामी केली जाईल.असे देखील प्रकार केले जात असुन काही चेले मंडळीची देखील तहसीलदारांनी अप प्रचार करण्यासाठी नियुक्ती केली आहे.मात्र मी कोणत्याही प्रकाराकडे लक्ष देणार नाही.महसूल मंत्र्याकडे येत्या दोन दिवसांत पुराव्या निशी तहसीलदारांनी केलेल्या अनेक गैर प्रकाराची माहिती देण्यासाठी भेटायला जाणार आहे -अभिजीत साठे,तक्रारदार माढा 
कोट) तहसीलदार विनोद रणवरे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देणे टाळले असुन त्यांना अनेकदा फोन करुन संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
चौकट) तहसीलदारांचे वरातीमागुन घोडे-तहसीलदार विनोद रणवरे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल झाल्यानंतर आता तहसीलदार महोदयांनी सीना नदी काठी साठवलेल्या वाळु साठ्यावर कारवाई करण्यांसदर्भात फर्मान काढले आहे.त्यानुसार नदी काठच्या गावातील तलाठ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानुसार पंचनामे सुरु केलेत.तर काही तलाठ्यांना मागच्या तारखा टाकुन पंचनामे करायला सांगितल्याची विश्वसनीय माहिती सुत्रांकडुन समोर आली आहै.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages