- Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 8, 2024

 मोहोळमध्ये  शिवराज्याभिषेक दिनानिमित्त १३० जणांचे रक्तदान

राजमुद्रा प्रतिष्ठानचा उपक्रम



मोहोळ (कटूसत्य वृत्त);-मोहोळ येथील राजमुद्रा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिरात १३०  जणांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मोहळ नागरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. कौशिक गायकवाड, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, संतोष गायकवाड कातेवाडीचे सरपंच भरत क्षीरसागर, चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष प्रवीण डोके,मालिकपेठचें सरपंच गणेश जगताप, अण्णासाहेब बचुटे, श्रीरंग लाळे उपस्थित  
होते.संस्थापक अध्यक्ष तथा मोहोळचे उपनगराध्यक्ष प्रमोद डोके यांच्या संकल्पनेतून राजमुद्रा प्रतिष्ठान मागील बारा वर्षापासून हा उपक्रम राबवत असून कोरोना काळातही खंड पडू दिला नाही. त्यामुळे कोरोना काळातील रक्ताची उणीव न भासण्यासाठी उल्लेखनीय मदत झाली. आजच्या रक्तदान शिबिरात अकरा महिलांनी सहभाग नोंदवला.
 हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राजमुद्रा प्रतिष्ठानचे प्रमोद (बापू) डोके, सोमनाथ राऊत,रविराज (बापू) मांडवे, मुकेश बचुटे, नागेश भोसले रत्नाकर डोके,युवराज सूर्यवंशी,अतुल घाटगे, रणजीत(छोटू)भोसले फत्तेसिंह देशमुख, प्रवीण नागटिळक,गणेश भोसले, दिलीप कोकणे दीपक डोके  यांनी परिश्रम घेतले.या रक्तदान शिबिरास सोलापूर येथील अक्षय ब्लड बँकेचे सहकार्य लाभले..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages