खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 14, 2024

खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी

 खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर शहरातील नाले सफाई आणि पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि नाले सफाई अर्धवट झाल्यामुळे, शहरातील अनेक नागरिकांच्या व राहिवाश्यांच्या घरा-घरामध्ये पाणी शिरून नागरिकांची अहोरात्र बेहाल होत असल्याने याची गांभीर्याने दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी शहरातील मोदी नाला, पटवर्धन चाळ नाला, कारंबा नाला, कुंभार वेस नाला व इत्यादी भागात असलेल्या नाले सफाई ची आणि मोदी, जगजीवन राम झोपडपट्टी, भैरु वस्ती, पटवर्धन चाळ, २नंबर झोपडपट्टी, निराळे वस्ती, आदी भागातील घरात पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली. आणि सोलापूर महानगर पालिका अधिकाऱ्यांना तात्काळ नाले सफाई, ड्रेनेज दुरुस्ती, पावसाळी पाण्याचा निचारा करण्यासाठी तात्काळ काम सुरू करण्याची सूचना केली.

यावेळी चेतन नरोटे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, संजय हेमगड्डी, बाबा मिस्त्री, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, देवाभाऊ गायकवाड, आशाताई म्हेत्रे, गणेश डोंगरे, अंबादास बाबा कऱगुळे, बाबुराव म्हेत्रे, तिरुपती परकीपंडला, युवराज जाधव, सुभाष वाघमारे, दिनेश डोंगरे, चंदू नाईक, राजू निलगंटी, शिवा म्हेत्रे, वेदमूर्ती म्हेत्रे, राजू दिवटे, यासीन शेख, समीर शेख, यांच्यासह सोलापूर महानगर पालिकेचे अधिकारी वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages