Hot Posts

6/recent/ticker-posts

निवडणूक आयोगाने आचारसंहितेची एकसमान अंमलबजावणी केली पाहिजे.

 निवडणूक आयोगाने आचारसंहितेची एकसमान 

अंमलबजावणी केली पाहिजे.


पुणे(कटूसत्यवृत्त):-निवडणूक आयोगाने आचारसंहितेची एकसमान अंमलबजावणी केली पाहिजे. ‘तुमचे मंगळसूत्र काढून घेतले जाईल,’ यासारखे तथ्यहीन प्रचार किंवा एखाद्या समुदायाला लक्ष्य करणाऱ्या विधानांवर आयोगाने कठोर कारवाई केली पाहिजे. मग ते पंतप्रधान जरी असले, तरी निवडणुकीत उमेदवार आणि पक्षाचे प्रचारक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले गेले पाहिजे. आयोगाची भूमिका संदिग्ध असल्यास सर्व उमेदवारांना समान संधी नाही, अशी धारणा मतदारांमध्ये वाढून त्याचा निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता आणि पर्यायाने लोकशाहीवर विपरीत परिणाम होऊ शकतो,’ असे परखड मत राज्याचे माजी निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments