Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ तालुक्यातील चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अन्यथा बोंबाबोब आंदोलन करू प्रभाकर भैया देशमुख

 मोहोळ तालुक्यातील चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा व तातडीची आर्थिक मदत करा अन्यथा बोंबाबोब आंदोलन करू प्रभाकर भैया देशमुख 


        मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून चक्रीवादळाने थैमान घातलेला आहे अशा परिस्थितीत पाटकुल पेनुर खंडाळी पापरी येवती व इतर गावांमध्ये फळबागा व विशेषता केळी अक्षरशा झोपलेले आहेत घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत याबाबत वस्तुस्थिती समझताच महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोहोळचे माननीय नायब तहसीलदार वराडे व दुसरे नायब तहसीलदार धाईजे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे मोहोळ तालुक्यातल्या खंडाळी पेनुर पाटकुल पापरी येवती विशेषतः वीज पडून पापरी येथील गोसावी या महिला भगिनी मृत्युमुखी पडले आहेत तसेच खंडाळी येथील शेतकऱ्यांची मुखे जनावर दगावल म्हणजे मृत्युमुखी पडलेल आहे त्यांना पण तातडीची आर्थिक मदत द्यावी व इतर गावच्या शेतकऱ्यांच्या पिकांची व फळबागांची विशेष केळींचे आलेल्या तुफान चक्रीवादळामुळे खूप मोठे नुकसान झालेले आहे व घरावरचे पत्रे उडुन गेलेले आहेत तसेच घराच्या भिंती पाडलेल्या आहेत व तेथील पाटकुल येथील धनाजी शेटे यांचे तर नवीन घर बांधलेले जागेवर उध्वस्त झालेले आहे यांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी या मागण्यांचे निवेदन देण्यात आले याबाबतच्या प्रती माननीय मुख्यमंत्री कृषिमंत्री पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे लेखी स्वरुपात कळविलेले असल्याचेही पत्रकारांशी बोलताना प्रभाकर देशमुख महणाले यावेळी जनहितचे युवा जिल्हाध्यक्ष नाना मोरे ओबीसी भटक्या विमुक्त संघटनेचे जनहितचे तालुकाध्यक्ष बिरू वाघमोडे मागासवर्गीय सेलचे गोवर्धन घोलप बंडू लोखंडे इत्यादी दिसत आहे

Reactions

Post a Comment

0 Comments