Hot Posts

6/recent/ticker-posts

निबंध स्पर्धेत राजकिरण चव्हाण राज्यात प्रथम

 निबंध स्पर्धेत राजकिरण चव्हाण राज्यात प्रथम


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-जागर फाऊंडेशन व निर्मिती बहुउद्देशीय संस्था, बावी (आ.) यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक बंधु भगिणींसाठी आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला याबद्दल राजकिरण आत्माराम चव्हाण (श्री समर्थ विद्यामंदिर, सोलापूर) यांना बार्शी जि. सोलापूर येथे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

       या स्पर्धेत व्दितीय क्रमांक सतिश सोमनाथ होनराव (सिल्व्हर ज्युबली हायस्कूल बार्शी) तर राहुल नारायणराव तुगावकर (जि. प. प्राथमिक शाळा आंबयेपाटील ता. खेङ जि. रत्नागिरी) यांनी राज्यात तृतीय येण्याचा मान मिळवला आहे.

    राजकिरण चव्हाण यांचा 'सजग पालकत्व व मुलांवरील संस्कार' या विषयावरील निबंधाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व तीन हजार रुपयांची सुप्रसिद्ध पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागात एकुण २३ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दहा शिक्षकांना उत्तेजनार्थ पारितोषिक तर दहा शिक्षकांना उत्कृष्ट निबंध लेखन अशी पारितोषिके जाहीर करण्यात आली.

     अमरावती, ठाणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, चंद्रपूर राज्यातील विविध जिल्ह्यातून साडेपाचशे हून अधिक सहभागी शिक्षकांनी फाऊंडेशनने पुरविलेल्या विविध विषयांवर निबंध लेखन केले आहे.

     प्रा. वसुंधरा पाटील, प्रा. रजनी देशपांडे, प्रा. रामराजे शिर्के यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सदरची राज्यस्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उमेश घोलप यांचे मार्गदर्शन लाभले. तर गुणवंत विधाते, गणेश गोडसे, अमोल कुलकर्णी, शिवव्याख्याते खंडू डोईफोडे, महादेव कोकरे पाटील, शितल पाटील आदींचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे मत जागर फाऊंडेशनचे संस्थापक विशाल चिपडे यांनी यावेळी व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments