श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून अहिल्यादेवीं विनम्र
अभिवादन .....
उरी बाळगूनी स्वप्न मराठी सत्तेचे, बांधुनी तोरण हजारो गडकिल्ले, मंदिरांचे, घडविले ज्यांनी नव्या हिंदुस्तानाला, नमन त्या अहिल्यादेवीना राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती..
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने चार हुतात्मा चौक येथील राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
अहिल्यादेवी यांच्या कार्याची महिलांनी प्रेरणा घ्यावी असेच आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला. न्यायप्रिय शासन व्यवस्था उभारून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम केले. अहिल्यादेवी होळकर यांचे राज्य परिवर्तनवादी व पुरोगामी होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली. त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच हुंडाबंदी, मद्यबंदी बाबत जागृतीचे काम केले.असे मनोगत श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे यांनी व्यक्त केले....
या अभिवादन पर कार्यक्रमा प्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर { नाना} काळे,ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे,ट्रस्टी सदस्य राजन जाधव,विजय भोईटे,चेतन नरोटे,मतीन बागवान,प्रकाश ननवरे,विनोद भोसले ,माऊली पवार, श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सुभाष पवार,रवी मोहिते ,शिवाजी वाघमोडे,जितू वाडेकर,विवेक फुटाणे, प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे,उज्वल दीक्षित,राजू आलूरे,सचिन स्वामी देविदास घुले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती...

0 Comments