अकलूज येथील रिदम हार्ट हॉस्पिटलचा विषय मंत्रालयात
अकलूज (कटूसत्य वृत्त):-संग्रामनगर-अकलूज, येथे नव्याने स्थापन झालेल्या रिदम हार्ट अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा विषय मंत्रालयात पोहचला असून,लवकरच रिदम हार्ट हॉस्पिटल व तेथील डॉक्टर टीम चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत अशी खात्रीशीर माहिती पुढे आली आहे.
संग्रामनगर-अकलूज येथे अगदी चार पाच महिन्यांपुर्वी डॉ. संभाजी राऊत, डॉ. सौरभ गांधी, डॉ. रोहन हेगडे यांनी मिळून हृदय विकार संदर्भातील, रिदम हार्ट अँन्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले आहे. सदर हॉस्पिटलमध्ये आयूष्मान भारत, ही शासकिय योजना आणण्यासाठी, या तीन डॉक्टरांनी तब्बल तीस लाख रूपये, लाच आणि लालच देण्याचे आश्वासन, संबंधित विभागातील व्यक्तीला दिले होते. तसेच योजना मिळवण्यासाठी, लागणारे ऑडीट खोटे करून घेतल्याचे समजले होते. हॉस्पीटल सुरू होऊन सहा महिनेही झाले नव्हते, तोपर्यंत यांनी एक वर्षाचे ऑडीट केलेच कसे? ही शासनाची मोठी फसवणुक नाही का?
रिदम हार्ट हॉस्पिटलला लायसन नोव्हेंबर २०२३ मध्ये मिळते आणि ओपनींग ४-२-२०२४ रोजी होते. असे असेल तर हॉस्पिटलच्या रूग्णांचे एक वर्षाचे ऑडीट कसे झाले? कशाच्या आधारे केले, याची तपासणी होणे गरजेचे आहे.आयुष्मान योजना मिळवण्यासाठी खोटे ऑडीट केले गेले. त्यावरती सोलापूर जिल्हा मेडिकल ऑफिसर, सोलापूर जिल्हा समन्वयक आणि उस्मानाबाद येथील शल्य चिकित्सक यांनी ऑडिट रिपोर्टवर सह्या केल्या कशा? असे खोटे ऑडीट रिपोर्ट सादर करून व पैसे खाऊ घालून, योजना मिळवू इच्छिणाऱ्या हॉस्पिटलचे लायसन रद्द व्हावे, सदर तिनही डॉक्टरांची चौकशी करून ते दोषी आढळल्यास त्यांची सनद रद्द करण्यात यावी, खोटे ऑडीट केले हे सिध्द झाल्यास, ऑडिटवर सह्या करणारे यांना निलंबित करावे.अशी तक्रार मंत्रालयाच्या विविध विभागात गेली असून, लवकरच यांची चौकशी सुरू होईल अशी माहिती मिळाली आहे.

0 Comments