सिव्हिल हॉस्पिटल लोधी गल्ली परिसरात दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 13, 2024

सिव्हिल हॉस्पिटल लोधी गल्ली परिसरात दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी

 सिव्हिल हॉस्पिटल लोधी गल्ली परिसरात दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी

उजनी धरण मायनस मध्ये, स्मार्ट सिटीच्या कोट्यावधीच्या स्काडा सिस्टीमचा बोजवारा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील लोधी गल्ली येथे सोलापूर महानगरपालिकेच्या मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत.येथून दररोजच शहरात विविध ठिकाणी पाणी सोडण्यात येते. परंतु सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील लोधी गल्ली या परिसरातून असंख्य अनधिकृत नळाचे कनेक्शन्स असल्यामुळे व त्यांना तोट्या नसल्यामुळे पाणी सोडल्यापासून ते पाणी बंद करेपर्यंत दररोज सकाळी तीन ते चार तास लाखो लिटर पाणी लोधी गल्ली, आडके हॉस्पिटल ,बेडरपुल या परिसरातून वाहत जाताना गेली अनेक महिने दिसत आहे. येथील नागरिकांनी अक्षरशः रस्त्यावर जागोजागी पिण्याच्या पाईपलाईनला अनधिकृतपणे फोडून रस्त्यावरच असंख्य नळांची कनेक्शनस घेतलेली दिसत आहेत. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येथील मुख्य पाईपलाईनमधून प्रचंड गळती होऊन फार मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झालेली आहे. एकीकडे सोलापूरला सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे, उजनी धरण मायनस मध्ये गेल्यामुळे तिबार पंपिंग केले जात आहे व त्यात लोकांच्या टॅक्स स्वरूपी पैशातून कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला जात आहे. भारतातील सर्वात मोठी स्काडा प्रणाली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोलापुरात कार्यान्वित करण्यात आली परंतु त्याचा संपूर्ण बोजवारा उडालेला दिसत आहे.गेले कित्येक महिने होणाऱ्या दररोजच्या या पाण्याच्या नासाडीमुळे येथील केलेले रस्ते उखडून मोठे खड्डे पडलेले आहेत. दररोज असंख्य लीटर प्यायच्या पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे रस्त्यावरून नागरिकांना चालणे अथवा वाहने चालवणे अतिशय अवघड होत आहे. या अनधिकृत पाईप मधून रस्त्यावर साठलेले घाण पाणी पुन्हा मुख्य पाईप लाईन मध्ये ओढल्या जाते व असे दूषित पाणी दुसऱ्या दिवशी पुरवल्या जाते. येथील पाण्याच्या टाक्यांची संरक्षक भिंत पाडून टाकून तेथे अक्षरशः कचरकुंडी होऊन अवैध उद्योग सुरू आहेत.याबाबतीत सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व संबंधित व वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वारंवार तक्रारी करून सुद्धा त्यावर कोणतेही कारवाई आजपर्यंत करण्यात आलेली नाही. अधिकृत नळ कनेक्शन असणाऱ्या पाईपमध्ये गळती झाल्यास सोलापूर महानगरपालिका तात्काळ त्यांना नोटीस बजावते व दंड करते परंतु येथील अनाधिकृत नळाच्या कनेक्शनस वर व दररोज होणाऱ्या लाखो लीटर पाण्याच्या नासाडीबद्दल सर्व संबंधित अधिकारी का डोळेझाक करीत आहेत?



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages