पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर,
भ्रष्ट पोलिस
भ्रष्ट व्यवस्था
भ्रष्ट प्रशासन
भ्रष्ट राजकारणी
भ्रष्ट व्यावसायिक
भ्रष्ट एक्साईज विभाग
भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे.
-जर नियमाप्रमाणे पब बंद असते
-जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना मद्य दारू पबमध्ये पुरवली नसती
-जर नियमाप्रमाणे शोरुमने ती कार क्रमांकाशिवाय दिली नसती
-जर नियमाप्रमाणे पालकांनी अल्पवयीन मुलाला ती कार चालवायला दिली नसती,
- जर नियमाप्रमाणे ट्राफिक पोलिसांनी गाडीवर कारवाई केली असती तर दोन्ही तरणी पोरं रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली नसती..
ऐरवी साधा हेल्मेट नाही घातला, लायसन्स, पियुसी जवळ नाही म्हणून ट्राफिक पोलिस टोळधाड पडल्यासारखे अंगावर येऊन आपल्या खिश्याचे लचक तोडतात. मग रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बिना नंबर प्लेटची डोळ्यात भरणारी महागडी गाडी सुसाट पळतेय हे दिसत असूनही वाहतूक पोलिसांनी कारवाई का केली नाही.?
वरुन मागच्या दाराने पोलिस ज्याने दोघांना चिरडलं, २ कुटुंब उध्वस्त केली अश्या नालायकाला ताब्यात घेतल्यावर मागच्या दाराने बिर्याणी पिझ्झा बर्गर पुरवतात...आपल्याहातून २ जणं मेल्याचा जराही गिल्ट नसलेला बड्या बापाचा पोरगा तो निर्लज्जपणे खातो सुद्धा.
मेलेल्यांना न्याय द्यायला नाही तर आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी न्यायालय कामकाज करतं का? आणि काही तासात नजराणा पेश करावा तसा जामिन मंजूर होतो. अशी भावना आहे
दोघांचा जीव गेला आणि न्यायालयाने रविवार असून बक्षिस द्यावं तसा जामिन दिला, त्यात अट काय तर
-३०० शब्दांचा निबंध लिहीण्याची
- मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेण्याची
- १५ दिवस वाहतूकीचे धडे गिरवण्याची...यापेक्षा जास्त शिक्षा तर शाळेत द्यायचे...इथे २ पोरं मेली...
-विदाऊट लायसन्स गाडी चालवल्यास ३ महिने तुरुंगवास
-अल्पवयीनाने वाहन चालवल्यास ३ महिन्यांचा तुरुंगवास
-मद्यपान करुन वाहन चालवल्यास ६ महिन्यांचा तुरुंगवास
- ओव्हरस्पिडींग असल्यास १ महिन्याचा तुरुंगवास
अहो साधं रेल्वे मध्ये विनातिकीट प्रवास केला तरी ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि इथें १५ तासात जामिन...वा....
यात निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी एक आमदार पुढे येतो आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो हे तर भयंकर आहे. पुणेकर न्यूज/ pune mirror च्या दाव्यानुसार वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हेच ते नेते आहेत ज्यांनी आरोपी गाडी चालवत नव्हता असा बनाव रचण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षदर्शीनी तो हाणून पाडला. हे खरं असेल तर अश्यांची पक्षातून सुद्धा हकालपट्टी व्हायला हवी.
मेलेल्या दोघांना मी ओळखत नाही... पण उद्या हेच तुमच्या माझ्यासोबत सुद्धा घडू शकतं.. म्हणून आपण बोललं पाहीजे... निदान या निर्ढावलेल्या व्यवस्थेपुढे तेवढं तरी ताठ मानेने आपण करायला हवं..
दारूच्या एका घोटाने दोघांचे बळी गेले, त्यात दारू पियुन गाडी चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला तसेच तो अल्पवयीन असल्याने त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली समाजात बदनामी झाली फक्त आणि फक्त त्या दारूच्या एका घोटामुळे झाली तर बांधवांनो विचार करा किती वाईट असेल तो दारूचा थेंब संपूर्ण आयुष्य उदवस्थ करून ठेवत म्हणून चांगल्या विचारांची माणसं जोडा त्यांच्या संपर्कात राहा निर्व्यसनी, निरोगी आयुष्य जगा 🙏
.jpg)
0 Comments