मनोरमा परिवार कर्मचारी कार्यशाळेचे आयोजन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-मनोरमा बँक तसेच मनोरमा मल्टीस्टेट व सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 12 मे 2024 रोजी मनोरमा बँक मुख्य कार्यालय बेन्नुर नगर येथे कर्मचारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीमनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे साहेब, प्रमुख पाहुणे मनोरमा सखी मंच अध्यक्ष सौ शोभा मोरे मॅडम आणि सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांची उपस्थिती लाभली. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चीफ ऑफिसर श्री नवनाथ बिराजदार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.कार्यशाळेत सहभागी कर्मचारी याना मार्गदर्शन करताना नवनाथ बिराजदार यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, बँकिंग विनिमय कायदा 1949 च्या अनुषंगाने वसुली बाबत मार्गदर्शन केले व त्याबाबत सखोल माहिती सांगितली.कार्यशाळेनंतर श्री नवनाथ बिराजदार यांनी मनोगत व्यक्त करताना मनोरमा बँकेने सतत सहा वर्ष शून्य टक्के थकबाकी राखले म्हणून अभिनंदन करत कौतुकही केले. यावेळी सौ शोभा मोरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सौ शोभा मोरे मॅडम म्हणाल्या छोटे छोटे उद्योग धंदे यांना कर्जे देऊन नवीन उद्योगधंदे व्यवसाय वाढ करण्यासाठी मनोरमा बँक नेहमीच प्राधान्य देत असते. कर्जाची वसुली कर्जदारांची मने जिंकून करावी तरच 100% वसुली होते असेही ते म्हणाले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप पतंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मनोरमा बँकेच्या कर्मचारी शाळेत एकूण शंभर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवल्यामुळे दिलीप पतंगे आणि उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले त्याचबरोबर बँकेच्या आर्थिक वाटचालीची व शंभर टक्के वसुली करून सतत सहा वर्ष शून्य टक्के थकबाकी राखल्याचे सांगत बँकेच्या प्रगती विषयी भरभरून कौतुक केले.त्यांनी प्रशिक्षण ही काळाची गरज असून दर तीन महिन्यांनी असे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात यावे असे सांगितले तसेच सर्व सहकारी संस्थेने सहकारी सहलीमध्ये सहभाग नोंदवावा आणि दररोज नवनवीन बदल घडत आहेत ते शिकण्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.अध्यक्षीय भाषणात श्रीकांत मोरे साहेब यांनी मनोरमा बँक मनोरमा मल्टीस्टेट आणि म्हणून परिवारातील सर्व सहकारी पतसंस्थांचा मिळून 2 हजार कोटीचा व्यवसाय पूर्ण केल्याचे सांगितले हे करत असताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक ही त्यांनी केले.मनोरमा बँक परिवार सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असते असेही त्यांनी सांगितले. यावेळी बोलत असताना ते म्हणाले सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे यांच्या कामाची प्रशंसा केली.
पुढे बोलताना ते म्हणाले सहकारी संस्थेत कर्जाची वसुली झाली नसेल तर संस्था अडचणीत येते असे सांगून मनोरमा बँकेने गेली सत्तावीस वर्षे अर्थकारणात एक चांगला पायंडा उभा केला असल्याचे सांगितले. ऑनलाइन बँकिंग, डिजिटल बँकिंग मुळे सहकार क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला असल्याचेही ते म्हणाले. ज्ञानाने ज्ञान वाढते म्हणून कार्यशाळेचे आयोजन करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. अर्थकारणात दररोज बद्दल होत आहेत, काल होते ते आज नाही आणि आज आहे ते उद्या नाही असेही त्यांनी सांगितले.सहकारी बँकिंग क्षेत्रात दररोज नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे अध्यायवत शिक्षण घेणे काळाची गरज आहे म्हणूनच कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मनोरमा बँकेच्या एकूण आठ शाखा असून मार्च 2024 अखेर मनोरमा बँकेने 1000 कोटीचा टप्पा पूर्ण केला असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर मनोरमा मल्टीस्टेट आणि इतर सहकारी पतसंस्था मिळून 1100 कोटीचा टप्पा पार केला असल्याचेही सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी मातृदिनाच्या निमित्ताने मनोरमा सखी मंच अध्यक्ष सौ.शोभा मोरे मॅडम यांचा मनोरमा परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी मनोरमा बँकेचे संचालक दत्तामामा मुळे, सुहास भोसले, गजेंद्र साळुंखे, शुभांगी भोसले, गणपत कदम, डॉ सुमित मोरे, डॉ ऋचा मोरे पाटील, मनोरमा बँकेचे मॅनेजर नीलकंठ करंडे, असिस्टंट मॅनेजर कमलाकर पुजारी, पुरुषोत्तम साखरे, मनोरमा मल्टीस्टेट चे डेप्युटी सीईओ अरुंधती नायडू, मॅनेजर नंदकुमार भोसले, सर्व शाखाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत मनोरमा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.शिल्पा कुलकर्णी यांनी तर प्रास्ताविक मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्ष सौ अस्मिता गायकवाड मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोरमा बँकेचे व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे आणि सूत्रसंचालन अजय मोरे यांनी केले

0 Comments