शिरूर लोकसभा मतदार संघातील पिंपरी दुमाला येथील मतदान केंद्रावर पोहचल्या 99 वर्षाच्या आजीबाई
शिरूर(कटूसत्य वृत्त):- वयाची 99 वर्ष पार केलेले यमुनाबाई गुलाबराव सोनवणे व वयाची 90 वर्ष पार केलेल्या हिराबाई गुलाबराव चिखले यांची मुले सत्तरीत पोहोचलेले तर नातू ४० पार केली आहे. अशा या सर्वांनी आज लोकसभेच्या निवडणुकीत आज मतदान करीत संविधानाने दिलेला अधिकार बजावत लोकशाहीचा वारसा जपला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील पिंपरी दुमाला गावात हा योग जुळून आला होता.
शिरूर लोकसभेतील महत्त्वाचं संपूर्ण कृषीप्रधान गाव असल्यामुळे अधिक चर्चेत आलेले गाव. या गावातील सोनवणे परिवारातील व चिखले परिवारातील परिवारातील यमुनाबाई गुलाबराव सोनवणे व हिराबाई गुलाबराव सोनवणे या दोन्ही आजींनी 90 व 100 वर्ष पूर्ण केले आहे. यमुनाबाई गुलाबराव सोनवणे यांना मुलगा मुलगी असा परिवार असून हिराबाई गुलाबराव चिखले यांना चार मुले आहेत या दोन्ही आजींच्या कुटुंबीयांनी आज पिंपरी दुमाला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज मतदान केले.
सोनवणे यांना यांना आज मतदानासाठी जायचं असल्यामुळे सकाळी नऊ वाजता तयार होऊन बसले होते दोन्हीही आजींच्या नातवाने आपल्याला दहा वाजता मतदानाला जायचे आहे असे सांगून अतिशय उत्साह मध्ये लोकशाहीच्या उत्सवांमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले
यावेळेस मतदान केंद्रावर ती अनेक नागरिकांनी आपला महत्त्वाचा मतदानाचा अधिकार बजावला यामध्ये प्रामुख्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विशालराव सोनवणे बापूराव शेळके सदाशिव चिखले आदित्य चिखले अमोल दुर्गे रोहन पाटेकर संदीप खळदकर पिंपरी दुमाला शाळेचे आदर्श शिक्षक कांताराम शिंदे सर आदींनी मतदानाचा अधिकार बजावला
हा परिसर शिरूर लोकसभा मतदार संघात आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटा कडून डॉ अमोल कोल्हे उभे आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील उभे आहेत लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत पार पडत आहे
वाढत्या वयाबरोबर शरीर क्षीण होत चालले आहे परंतु दोन्ही आजींमध्ये असलेला उत्साह त्यांना अद्याप आपली गोष्ट आपण करण्याचा त्यांचा आग्रह असतो या दोन्हीही आजीबाईंचा उत्साह पाहून आज रोजी संपूर्ण पिंपरी दुमाला मध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना येथे पिंपरी दुमाला मध्ये सकाळी
वेळ:-7:00 ते 6:00
पुरुष:-353
स्त्री :-310
एकूण मतदान :-663
एकूण टक्केवारी :-81:95 अशा पद्धतीने जवळपास 82% चा निर्णायक टप्पा शांततेत पार पडला
0 Comments