Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपला संविधान बदलण्यासाठी 400 चा आकडा पार करायचा आहे

 भाजपला संविधान बदलण्यासाठी 400 चा आकडा पार करायचा आहे


दिल्ली (वृत्त सेवा ):-लोकसभा निवडणुकीचे 2024 चे सहा टप्पे पूर्ण झाले असून सर्व पक्ष अंतिम म्हणजे सातव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी वृत्त वाहिनीशी बोलतांना लोकसभा निवडणुकीबाबत शशी थरूर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

शशी थरूर नरेंद्र मोदींबद्दल म्हणाले, पंतप्रधानांच्या तोंडून सर्वांबाबत नकारात्मक बोलल्याचे दिसून येते. त्यांनी कधी कधी सकारात्मक विचार करावा. देशात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याचा फायदा पंतप्रधान मोदींनीही घेतला आहे, ज्यांची सुरुवात नेहरूंनी केली होती. थरूर पुढे म्हणाले की, आपल्या देशातील इस्रो रॉकेट, चांद्रयान आणि गगनयान रॉकेट नेहरूंनी दिले आहेत. नेहरूंनी देशातील सर्व आयआयटी सुरू केल्या.’


थरूर पुढे म्हणाले की, ‘देशातील मोठे व्यवस्थापक मोठ्या कंपन्या चालवत आहेत, हे नेहरूंनी आयआयएमने सिद्ध केले. नेहरूंनी देशाला दिलेली सर्वात मोठी सदिच्छा म्हणजे लोकशाही. जवाहरलाल नेहरूंना लोकशाही सिद्ध करायची होती.’


भाजपला संविधान बदलण्यासाठी 400 चा आकडा पार करायचा आहे असा वादही त्यांनी केला. भाजपच्या ४०० चा आकडा पार करण्याच्या मुद्द्याबाबत शशी थरूर म्हणाले, ‘तुम्हाला इतक्या लोकांची गरज आहे का? जेणेकरुन सर्वजण मिळून संविधान बदलू शकतील? याचा अर्थ आपल्या देशासाठी हे अत्यंत धोकादायक आहे आणि लोकांचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी बदल आवश्यक आहे. असेही ते म्हणाले आहे.


निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेसने केलेल्या आरोपांबाबत शशी थरूर म्हणाले, ‘कोण खरे बोलत आहे आणि कोण खोटे बोलत आहे हे जनतेने पाहिले पाहिजे. आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्यांकडे लक्ष द्यावे. रोजगार, शेतकरी, पेट्रोल-डिझेलचे कमी दर, ही सर्व आश्वासने भाजपने दिली आहेत. देशात असा एकच पक्ष आहे जो 10 वर्षांपासून जनतेसमोर खोटे बोलत आहे. 2004 मध्ये आम्ही स्थापन केलेल्या सरकारमध्ये जनतेला सर्व काही दिले. काँग्रेसने प्रत्येक मूलभूत गोष्टी जनतेला दिल्या आणि शेवटी काँग्रेसला मतदान करून विजयी व्हा.’ असे आवाहनही त्यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments