Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदाना दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर

 मतदाना दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर


                सोलापूर (कटूसत्य वृत्त):-   भारत निवडणूक आयोगाने  लोकसभा सार्वत्रिक  निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे.  कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी दि. 7 मे 2024 रोजी  मतदान होणार आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे दिनांक 7 मे 2024 रोजी  या मतदानाच्या दिवशी संबंधित मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

             तसेच राज्याच्या सीमेलगत असलेल्या राज्यांमधील जे मतदार, महाराष्ट्र राज्यातील सीमा लगतच्या जिल्हयांमध्ये कार्यरत आहेत, तथापि, त्यांची नावे सीमेलगतच्या राज्याच्या मतदारयादीमध्ये समाविष्ट आहेत, अशा मतदारांना अधिसूचनामध्ये नमूद केलेल्या मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. सदरची सुट्टी केवळ मतदानाच्या दिवशी अनुज्ञेय असणार आहे. असे अपर जिल्हा दंडाधिकारी मनिषा कुंभार यांनी कळविले आहे.   

Reactions

Post a Comment

0 Comments