Ads

Ads Area

रानमसलेत बनली शाळा १ कोटी खर्चून

 रानमसलेत बनली शाळा १ कोटी खर्चून 

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील मराठी शाळेची इमारत एक कोटी रुपये खर्च करून सुसज्ज करण्यात आली. लक्ष्मी हायड्रोलिक्स कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) हे काम पूर्ण झाले. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची माहिती दिली. त्याचे उद्घाटन २१ एप्रिलला सकाळी साडेआठ वाजता होणार असल्याचेही म्हणाले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे अध्यक्षस्थानी असणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. चिंचोळी एमआयडीसीत मुख्यालय असलेल्या लक्ष्मी हायड्रोलिक्स ही इलेक्ट्रिक मोटर बनवणारी कंपनी आहे. रानमसले जिल्हा परिषदेच्या.त्यामुळे विद्यार्थी शाळेत येतनव्हते. शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. ही माहिती मिळताच, ठाकरे यांनी कंपनीच्या सीएसआर फंडमधून नवीन- इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. तो पूर्णत्वास नेला....

या इमारतीमध्ये पाच वर्ग खोल्या, कार्यालय, स्वच्छतागृह, संरक्षक भिंत, फर्निचर आणि इतर आवश्यक सुविधा आहेत. शहरातील अत्याधुनिक खासगी शाळांच्या तोडीस तोड अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या. त्यामुळे या शाळेत शिकणारे २२५ विद्यार्थी, १० शिक्षक आणि कर्मचारी यांच्यासाठी चांगली सोय झाली. आता ही शाळा कधीच बंद पडणार नाही, असा विश्वास शरदकृष्ण ठाकरे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close