स्व यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीन अभिवादन......
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर कृषी, शिक्षण, सहकार, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांत अनेक उपक्रमांना चालना देत यशवंतराव चव्हाण यांनी राज्याचा सर्वांगीण विकासावर भर दिला. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत अतुलनीय योगदान देणारे स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंती दिनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सात रस्ता येथील स्व यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकास राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे आणि जेष्ठ नैते हेमंत चौधरी याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले ..
या प्रसंगी यावेळेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, प्रमोद भोसले, संगीता जोगधनकर, चित्रा कदम, लता ढेरे,प्रियंवदा पवार ( कुंभकोणी),कांचन पवार, सुरेखा घाडगे, सुजित अवघडे, अंबादास सन्मलया,शामराव गांगर्डे, बसू कोळी,संजय मोरे,इरफान शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

0 Comments