ना नफा ना तोटा या तत्वावर कडबा खरेदी करण्याची प्रशासनाने हिम्मत दाखवावी -राजकुमार स्वामी
प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष मंगळवेढा
सोलापूर(कटूसत्यवृत्त):-सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील उत्पादित चारा, जिल्ह्याबाहेर वाहुन नेण्यास बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे ज्वारीचे कोठार म्हणुन ओळखला जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील ज्वारी उत्पादकांवर आस्मानी संकट निर्माण झाले आहे, एकीकडे गतवर्षी पासुन 5500 रुपये क्विंटल ने विक्री होत असलेली ज्वारी नवीन ज्वारी बाजारपेठेत येताच तिचे भाव 3000 रु.--3500 वरती आली . आणि आता जिल्हा अधिकारी यांनी घेतलेला निर्णय आमच्या शेतकरी बांधवांसाठी जिवघेणी ठरणारा आहे. ज्वारी काढणी साठी झालेले मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हाल कोणाला दिसत नाहीत मशागतीचा खर्च सोडाच पण ज्वारी काढण्यासाठी एका पेंडीला सहा रुपये, बांधण्यासाठी , दोन रुपये , मोडनिला दोन रुपये व गोळा करण्यासाठी दोन रुपये असा एकूण असा एकूण 12 ते 13 रुपये हा खर्च सर्वात कमी धरून आहे. त्यात कमी म्हणून सरकारने जिल्हा बंदी केली आहे म्हणजेच आपल्या कडबा जिल्ह्याच्या बाहेर जाणार नाही त्यामुळे व्यापारी कडबा 9 ते 10 रू पेंडी अशा अल्पशा दराने मागत आहेत.जर चुकून अवकाळी पाऊस पडला तर पूर्ण कडबा बाद होईल व कोणीच तो घेणार नाही ,पेटत्या चुलीत पाणी ओतल्या सारखे होईल.
जर जिल्हा अधिकारी यांना चारा टंचाई चे नियोजन करायचं होते तर साखर कारखानदारांकडुन गाळप होत असलेला ऊसा संदर्भात देखील निर्णय घेणे गरजेचे होते . त्यामुळे कारखानदार तुपासी शेतकरी ऊपासी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा अधिकारी यांनी घेतलेल्या निर्णयात शेतकरी भरडला जावु नये याची काळजी घ्यावी.
जिल्हा बंदी करायचीच असेल तर ना नफा ना तोटा तत्वावर जेवढा खर्च झाला आहे तेवढाच खर्च कडबा उत्पादकांना देऊन कडबा खरेदी करावा व शेतकर्यांची होणारी पिळवणूक थांबवावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तसेच शिवसेना (उबाठा गट ) वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी, शिवसेना तालुका शहर प्रमुख दत्ता भोसले, रमेश लोखंडे, रुकेश पुजारी, दत्ता कोरे,शशिकांत काळे, प्रकाश मेटकरी,रफिक तांबोळी, बाळु मुंगसे, गोटु चौगुले, याच बरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते तसेच तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

0 Comments