माढ्यातील साई पब्लिक स्कूल मध्ये शिवसृष्टीचा देखावा,मान्यवरांकडुन देखाव्याचे उद्घघाटन
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शहरातील साई पब्लिक स्कूल मध्ये शिव सृष्टीचा देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत,काॅग्रेसचे नेते दादासाहेब साठे,झुंजार भांगे,राजेंद्र चवरे,प्रा.डाॅ मगन सुरवसे,प्रा.रवि सुरवसे,रंजना सुरवसे,शितल सुरवसे,प्राचार्य गीता घाडगे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देखाव्याचे उद्घघाटन पार पडले.जिवन जगत असताना शिव चरित्राचा अभ्यास करणे गरजेचे असुन शिवचरित्र सर्वासाठी प्रेरणादायी असल्याचे मत मांडुन शाळेच्या उपक्रमाचे मान्यवरांकडुन कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिव राज्याभिषेक सोहळ्या पर्यंतची सर्व ऐतिहासिक प्रसंग विद्यार्थ्यानी जिवंत देखाव्यातुन उत्कृष्ट रित्या सादर केले.पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना शिव चरित्राची माहिती व्हावी या उद्देशाने या देखाव्याचे आयोजन शाळेकडून करण्यात आल्याचे प्राचार्य.गीता घाडगे यांनी प्रास्ताविकातुन बोलताना सांगितले.शिवसष्टी च्या देखाव्या मुळे शाळेचा परिसर शिवमय झाला होता.यावेळी विद्यार्थ्यानी जय जय जिजाऊ..जय शिवराय चा जयघोष केला.

0 Comments