Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार संतोष बांगर म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक - प्रा कुलकर्णी

 आमदार संतोष बांगर म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक  - प्रा कुलकर्णी

 प्रा काकासाहेब कुलकर्णी यांची आमदार बांगर यांच्यावर सडकून टीका  

 सोलापूर(कटूसत्य वृत्त):- काल एका कार्यक्रमांमध्ये आमदार संतोष बांगर बोलताना  काँग्रेसवर टीका करत असताना  अश्लील हातवारे करत  टीका केली होती . महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही भारताला आदर्शवत आहे परंतु आमदार संतोष बांगर हे   यापूर्वी टीका करताना अश्लील हातवारे  केले होते त्यावेळेला त्यांच्यावर महाराष्ट्रात सर्व स्तरातून  टीका करण्यात आली होती  परंतु पुन्हा आठच दिवसांनी  काँग्रेसवर टीका करत असताना  अश्लील हातवरे करत टीका केली होती  यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते  प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी  आमदार संतोष बांगर हे तमाशातील नाचे असल्याचे संबोधले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येणारे आमदार हे  सुसंस्कृत व उच्च शिक्षित असतात परंतु संतोष बांगर हे  यांचे कारकीर्द अतिशय वादग्रस्त असून  ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत   महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी त्यांना योग्य ती समज द्यावी  अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते  प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी केले  आहे .

Reactions

Post a Comment

0 Comments