सोलापुराचे भाजप उमेदवार राम सातपुते यांना बदला आणि स्थानिक उमेदवार दया...
1990 पासून भाजपचे काम करणारे सोलापूरचे इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांची मागणी...
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असलेले दिलीप शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत बाहेरून आयात केलेले राम सातपुते यांना बदला आणि स्थानिक उमेदवार दया अशी मागणी केलीय. माढ्याचा भाजप उमेदवारानंतर आता सोलापूरचा भाजपचा उमेदवार राम सातपुते यांना बदलण्याची मागणी भाजपचे कार्यकर्ते तथा सोलापूर लोकसभा इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी केली आहे. सोलापुर लोकसभेसाठी भाजप कडून 19 स्थानिक उमेदवार इच्छुक असताना राम सातपुते हे बाहेरून उमेदवार आयात केल्याने याचा मोठा परिणाम निवडणुकीवर होवू शकतो.त्यामुळे त्यांना बदला आणि इच्छुक 19 उमेदवारांपैकी कुणालाही उमेदवारी दया.अशी मागणी होत आहे.
भाजपातील काही मंडळी ही वरिष्ठांची दिशाभूल करत आहे.भाजपचे हे विजयाचे सीट असताना काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी काहींनी हा घाट घातल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते तथा इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी केलाय.
0 Comments