Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींचा पुतळा उभा केला जाणार, पुतळा स्थापन समितीचे अध्यक्ष म्हणुन माजी आमदार धनाजीराव साठे यांची निवड

 माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात  छत्रपतींचा पुतळा उभा केला

 जाणार, पुतळा स्थापन समितीचे अध्यक्ष म्हणुन माजी आमदार

 धनाजीराव साठे यांची निवड 

माढा (कटूसत्य वृत्त):-माढा शहरातील  छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य असा छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा उभा केला जाणार आहे.२०२५ च्या शिवजयंती च्या सोहळ्या अगोदर पुतळा उभा करण्याची प्रकिया पुर्ण केली जाणार आहे.माढा शहरवासियांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्या संदर्भात शिवभक्तांनी माढा  नगरपंचायत कार्यालयासमोर बैठक घेतली.या बैठकीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात  पुतळा उभारण्याचा  निर्णय एकमताने घेण्यात आला.पुतळा  स्थापन  करण्याच्या  समितीचे अध्यक्ष म्हणुन माजी आमदार धनाजीराव साठे यांची निवड या बैठकीत करण्यात आली असुन त्याच्या अध्यक्षतेखाली समितीचे कामकाज केले जाणार आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा व्हावा ही मागील अनेक वर्षापासूनची माढेकरांची मागणी असुन या मागणीला  कृतीची जोड मिळणार आहे. शहरवासीयांच्या  वतीने यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अॅड.मिनल  साठे यांचेसह अन्य नेते मंडळीनी आपल्या भाषणातून शहराच्या वैभवात भर टाकणारा दिमाखदार व भव्य असा अश्वारुढ पुतळा उभा करण्यासाठी सर्व प्रकारे मदत करण्याचे आव्हान देखील केले.बैठकीस नगराध्यक्षा अॅड मिनल साठे,उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे,काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे, मा.जि.प सदस्य झुंजार भांगे,आनंदराव कानडे,राजाभाऊ चवरे,नगरसेवक शहाजी साठे,नगरसेवक आजिनाथ माळी,सभापती नितीन साठे,शिवाजी जगदाळे,गुरुराज कानडे,शंभू साठे,संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे,बाबा मस्के,संतोष साठे,पिंटू भांगे,दत्तात्रय अंबुरे,दिनेश गाडेकर,बाळासाहेब चवरे,भैय्या खरात,अनिकेत चवरे,बंडू पवार,किरण चव्हाण यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments