तर धैर्यशील मोहिते पाटील तुतारीचा आवाज दिल्लीत पोहचवतील! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 28, 2024

तर धैर्यशील मोहिते पाटील तुतारीचा आवाज दिल्लीत पोहचवतील!

 तर धैर्यशील मोहिते पाटील तुतारीचा आवाज दिल्लीत पोहचवतील!

अकलूज(कटूसत्यवृत्त):-प्रतिष्ठेच्या सर्वोच्च शिखरावरती विराजमान असतानाही, शालेय जीवनापासून समाजसेवेची आवड असणारे,धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून तुतारीचा आवाज दिल्लीला पोहोचवून, एक अभूतपूर्व इतिहास घडवतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांसह सर्वसामान्य जनतेला वाटतो आहे.

            कारण निवडणूक आमदारकीची आसो,किंवा खासदारकीची असो, किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समिती, ग्रामपंचायती,सहकारी संस्था किंवा विविध संस्थेच्या असो, धैर्यशील मोहिते पाटील यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडून दाखवल्या आहेत व जिंकल्या आहेत, आणि हे अखंड सोलापूर जिल्ह्याच्या राजकारण्यांनी पाहिले आहे. आज स्वतःच धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार आहेत.कारण निवडणूक न लढविल्यास, आत्मदहन करणार आहे, असे त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले आहे .  

                    कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा नेता हा, कार्यकर्त्यांच्या हृदयस्थानि कायम विराजमान झालेला असतो आणि यापैकीच एक धैर्यशील मोहिते पाटील म्हणून ओळखले जातात. इतिहास घडवणारे, लढणारे, आणि जनतेच्या हितासाठी झुंजणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांचा ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटला आहे. आलेल्या राजकीय, संकटांना ते कधीच शरण आले नाहीत. त्याला लगाम लावत सामोरे गेले आहेत, आणि स्वतः इतिहास  धडवत आले आहेत. लाखो गोरगरिबांच्या आयुष्याचे सोने करणारे, धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कार्याचा ठसा अखंड सोलापूर जिल्ह्यातच नवे, तर महाराष्ट्र राज्यात  उमटला आहे. अशा अत्यंत बलवान आणि प्रामाणिक युवा नेतृत्वाने  माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास नक्कीच ते इतिहास घडवतील यात शंका नाही.

 कारण असीम धैर्य, परिस्थितीचे अचूक मूल्यमापन, प्रबळ इच्छाशक्ती, उत्कृष्ट समाजकारणी व राजकारणी, लोककल्याणकारी आणि ध्येय धोरणांची पारदर्शक प्रभावी अंमलबजावणी करणारे धैर्यशील मोहिते पाटील हे राजकीय रणांगणातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.कारण  त्यांचा,सर्वच क्षेत्रामध्ये प्रभाव आहे. असे राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत 

अफाट निर्णय क्षमता, सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित राजकारणी, कल्पक विचारसरणी, संयम,नम्रता, उत्कृष्ट वैचारिक बुद्धिमत्ता, उत्कृष्ट स्मरणशक्ती, समदृष्टीपणा, संवादाची हातोटी,जनविकासाबद्दलची असणारी आत्मीयता, उत्कृष्ट शिक्षण संस्था चालक, अतुलनीय प्रेरणादायी असे विकासकामांत योगदान असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघातून आता निवडणूक लढवावी, अशी मागणी तमाम युवकांनसह,या मतदार संघातील जनता करू लागली आहे. कारण धैर्य आणि शौर्य धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गुणात दिसून येत आहे असे सामान्य माणसाच्या भावना आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages