लोकमंगल बँकेच्या सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-लोकमंगल बॅकेची स्थापना दि. २८/०४/१९९८ रोजी झाली असून चालू वर्षी बँकेला ग्राहक सेवेचे २६ वर्ष पुर्ण होत आहेत या कालावधीत बँकेने भागदारकांचे, खातेदार तसेच कर्मचारी यांचे हित जोपासले आहे. मागील २४ वर्षाच्या कालावधीमध्ये बँकेने ९ टक्के ते २० टक्के या दरम्यान लाभांश वाटप केलेला आहे. कोव्हिड काळात सर्वांनाच अडचणी होत्या बँकेने सन २०२२ - २०२३ या आर्थिक वर्षाकरीता ९ टक्के लाभांश घोषित केला आहे. मार्च २०२३ अखेर बँकेचे एकूण ११२८९ सभासद असून या सर्व सभासदांच्या खात्यावर सन २०२२ - २०२३ सालचे लाभांश जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशसिंह लक्ष्मणसिंह बायस यांनी दिली.
0 Comments