Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी 'आर्टी' संघटनांनी जल्लोषात केले निर्णयाचे स्वागत

 बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी 'आर्टी'

 संघटनांनी जल्लोषात केले निर्णयाचे स्वागत

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी)  धर्तीवर साहित्यरत्न डॉ, अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) च्या स्थापनेची व पुण्यातील संगमवाडी येथील क्रांतिगुरु लहुजी साळवे स्मारकाचे २ मार्च २०२४ रोजी भूमिपूजन करण्याची  घोषणा काल   विधिमंडळात मांडण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  आर्टी व क्रांतिगुरु लहुजींच्या स्मारकासाठी लढा देणाऱ्या मातंग समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद व जल्लोष व्यक्त करत लाडु वाटप करुन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुहास शिंदे, ज्येष्ठ नेते श्रीकांत बोराडे, सकल मातंग समाज राज्य समन्वयक  तथा संयोजक सुरेश पाटोळे, युवा नेते गोविंद कांबळे, रोहित खिलारे, विश्वनाथ पाटोळे, नितिन साठे, विश्वेश्वर गायकवाड, बापू गायकवाड,प्रा. मारुत घंटेवाड, किशोर जाधव सर रवी गायकवाड,विशाल गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.


       यावेळी सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक सुरेश पाटोळे यांनी माहिती देताना सांगितले की 'गेले दहा वर्षापासून मातंग समाजातील विविध संघटनांकडून आर्टी स्थापनेसाठी व स्मारक उभारणीसाठी आंदोलने, मोर्चे, धरणे, अमरण उपोषणे, साखळी उपोषणे, पदयात्रा या स्वरूपाची तीव्र आंदोलने करून तत्कालीन राज्य सरकारांचे लक्ष वेधले होते.हजारो निवेदने सरकारला दिली गेली होती. समाजातील विविध स्तरातून केले गेलेल्या पाठपुराव्यास अखेर यश मिळाले आहे. 

       आर्टीच्या स्थापनेमुळे  मातंग समाजाचा सर्वांगीण विकास होणे शक्य झाले आहे. या संस्थेच्या वतीने भविष्यात अनेक समाज उपयोगी प्रकल्प राबविले जातील.त्यात कौशल्य विकास, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम, युवा नेतृत्व, संशोधन, ग्रंथालय, स्पर्धा परीक्षांची तयारी साठी  मार्गदर्शन केंद्रे आणि व्यावसायिक प्रशिक्षण यासारखे प्रकल्पांच्या माध्यमातून मातंग व तत्सम जातीतील  युवकांमध्ये आत्मविश्वास, माहिती आणि ज्ञान वाढवणे याचे काम केले जाईल. बेरोजगार युवती व युवकांना कौशल्य पुर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोगारक्षम बनवले जाईल. केंद्र व राज्य शासनाच्या विविध खात्यातील  नोकऱ्यांमध्ये मातंग व तत्सम जातीचे घटलेले प्रमाण भविष्यात वाढण्यास मदत होईल.'

आपला 

विशवनाथ पाटोळे

Reactions

Post a Comment

0 Comments