शेतकऱ्यांभोवती पडला खासगी सावकारीचा पाश : जागा जमिनी बळकावणाऱ्या टोळ्या सक्रिय
पिडीत शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या कांही दिवसांपासून खाजगी सावकार गावगुंडांना हताशी धरून गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतजमिनी गिळंकृत करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.खासगी सावकार, संघटीत गुंड, महसूल आधिकारी आणि स्थानिक पोलीस यांची अभद्र युती शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे.
याबाबत न्यायालय आणि उपनिबंधक यांच्याकडे वादातीत प्रकरणे प्रलंबित असतानाही संघटीत गुन्हेगार शेतकऱ्यांच्या मालमत्ता बळकावत आहेत.याबाबत सोलापूर शहर- जिल्हा पोलीस, महसूल तसेच उपनिबंधक प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालावं अन्यथा आपण अचानक आत्मदहन करु असा इशारा दक्षिण सोलापूर तालुक्यातील पीडित शेतकरी रामचंद्र कुंभार आणि त्यांचा मुलगा परमेश्वर कुंभार यांनी आज पत्रकार परिषदेत दिलाय.
कुंभार कुटुंबीय यांनी अडचणीच्या काळात सावकारांकडून पैसे घेतले होते.त्याची परतफेड संपत आली असताना खासगी सावकाराने घाई करत सदरची शेतजमीन शेतकरी कुंभार यांच्या परस्पर सोलापुरातील दशरथ कसबे या तडीपार गुंडाला विकली.कुंभार यांच्या जमिनीचा खटला न्यायालयात प्रलंबित असताना कसबे हा आपल्या टोळीतील सदस्यांना सोबत घेवून कुंभार यांच्या कुठुंबावर दहशत माजवत आहे.विशेष म्हणजे सर्व प्रशासकीय यंत्रणा या संघटितपणे कुंभार यांच्या परिवाराला त्रास देत आहेत.याबाबत ग्रामीण पोलिसांत तक्रारी दिल्या तर संबंधित गुंड हे शहर हद्दीतील असल्याचे सांगून बेदखल केले जात आहे.
दुसरीकडे सदर गुंडापासून जीविताला धोका असल्याने शहर पोलीस आयुक्त यांना दाद मागायला गेल्यावर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना भेटू दिले जात नाही. त्यामुळे या टोळीत अनेकांचा सहभागी आहेत का असा संशय येत आहे. कारण महसूलने चुकीचे उत्तरे काढणे, माहिती न देणे गुंडांना साथ देणे असे प्रकार वाढले आहेत. याप्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली तर ते शहरातील गुंड आहेत पोलीस आयुक्तांकडे जा असं सांगतात. पोलीस आयुक्तालयात तर पोलीस आयुक्तांना भेटूनच दिलं जात नाही अशी व्यथा ही रामचंद्र कुंभार यांनी मांडली.आम्ही आता न्याय कोणाकडे मागायचा त्यापेक्षा स्वतःच्या जीवनचं संपवलेलं बरं अशी हताश प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत व्यक्त केलीय.
.jpg)
0 Comments