नगरपरिषद वाचनालय च्या दुरावस्थे मुळे वाचक गायब !
दिवसा वाचनालय राञी मद्य प्रेमीचे बनते मद्यालय !
हजारो ग्रंथ पुस्तके वाचना अभावी धुळखात पडुन!
तुळजापूर (कटूसत्यवृत्त):-येथील नगरपरिषद मालकिचे असलेल्या वाचनालयाच्या इमारत दुरावस्थामुळे व दुर्लक्षित पणामुळे या ग्रंथालया कडे वाचक फिरकनासा झाला आहे. बुध्दीवंत वाचनवेड्या पुस्तक प्रेमी वाचकांची ज्ञानाची तहान भागविणा -या वाचनालय सध्या धुळखात पडले आहे पुर्वी ऐका खोलीत वाचनालय असताना वाचक मोठ्या प्रमाणात येत होते जागा पुरत नव्हती दररोज दोनशे ते अडीचशे पुस्तक देवघेव होत असे त्या नंतर ही जागा अपुरी पडत असल्याचा पार्श्वभूमीवर धाराशिव रोडवर कै उध्दवराव पाटील सभागृह परिसरात भव्य दिव्य असे १९९५ला बांधकाम करुन वाचनालयाला उभारले काही वर्ष चांगले चालले पण नंतर नगरपरिषद दुर्लक्षित पणा मुळे वाचनालय दुरावस्था सुरु झाली या दुरावस्थेचे अंतिम टोक सध्या या वाचनालयाने गाठले आहे
अवघ्या चोवीस वर्षात या वाचनालयातील भिंतीला सर्वञ मोठमोठाल्या भेगा पडल्या आहेत भिंतवर जळमटआले आहेत जमिनीवर फरशी नाही वाचक दालनात धुळ साचली असुन त्यामुळे ते बंद आहे वाचक दालनातील टेबलवर पुस्तकांचे गठ्ठे झाकुन ठेवले आहेत ग्रंथदेव बंद असल्या सारखी आहे.ऐका दुसरा वाचाक फिरकत आहे वाचक नोंदवहीवर ऐक किंवा दोन वाचकाच्या स्वाक्षरी आहेत काही स्वाक्षरी व वाचक नावे अक्षरे सह्या ऐकसारख्या आहेत, .ज्ञानाची भूक भागविणारे हे वाचनालय राञी मद्यपीचे मद्यलय बनले आहे .या वाचनालयाची तपासणी प्रक्रिया बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे याची चौकशी ची मागणि होत आहै.
सदरील वाचनालय जागा इमारत मध्यवर्ती व शांत ठिकाणी असताना नगरपरिषद च्या दुर्लक्षित पणामुळे ज्ञान देणारे मंदीर बंद झाले आहे.वर्षाकाठी लाखो रुपये या वाचनालायावर खर्च होत असताना वाचनालयाचा उद्देश साध्य होत नसल्याने या वाचनालयाची पाहणी मुख्याधिकारी यांनी पाहणी करुन नगरपरिषद वाचनालयास पुनश्च गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी लक्ष घालण्याची मागणी होत आहे

0 Comments