Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा किसान मोर्चा सोलापूर पूर्व विभागाची बैठक उत्साहात...!

जिल्हा किसान मोर्चा  सोलापूर पूर्व विभागाची बैठक उत्साहात...!  

विविध विषयावर झाली चर्चा ....!! 

जिल्हा किसान मोर्चा  जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हक्काचे केंद्र!! 



सोलापूर(कटूसत्य वृत्त):-,स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेसने एक हाती देशात सत्ता स्थापन केली. तरीसुद्धा देशातील कोणताच विकास झाला नाही. देशाला विकासाचे केंद्र आणि मेक इन इंडिया खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली सुरू असल्यामुळेच आणि देशातील शेतकरी हाच पोशिंदा असल्यामुळेच आजपर्यंत ज्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते त्याच शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेन्शन योजना सुरू करून फार मोठे धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळेच सध्याच्या शेतकऱ्यांचा सुद्धा या सरकारवर विश्वास वाढतोय. 

 "अब की बार 400 पार, मोदी की  गॅरंटी"  हे घोषवाक्य घेऊन संपूर्ण देशभर पुन्हा एकदा हॅट्रिक करण्यासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून भाजपाची ग्राम परिक्रमा यात्रा सुसाट वेगाने तळागाळापर्यंत जाऊन भाजपाचे विचार पोहोचवू लागली असून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू ठेवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविलेल्या विविध योजना जिल्हा किसान मोर्चाच्या माध्यमातून विशिष्ट अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून वाडी वस्तीवर पोहोचवण्यासाठी जिल्हा किसान मोर्चा सोलापूर पूर्व विभागाच्या वतीने शांती मंगल कार्यालय एम्प्लॉयमेंट चौक येथे भव्य आणि दिव्य कार्यक्रम  नुकताच संपन्न झाला. 

यावेळी जिल्हा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन भव्य सत्कार समारंभ भाजपाचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार सचिन  कल्याणशेट्टी, आणि दक्षिण सोलापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच घेण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा किसान मोर्चा मधील पदाधिकाऱ्यांनी  पुढील कार्यक्रमाची दिशा आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय आवश्यक आहे यासंदर्भात चर्चा केली. 

अक्कलकोट ,मोहोळ ,उत्तर सोलापूर,  पंढरपूर ,मंगळवेढा या सर्व तालुक्यातील पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांचा सत्कार करून सर्वांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस संदीप आबा गिड्डे पाटील,  प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत देशमुख यांनी  उपस्थित पदाधिकाऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले . यावेळी दक्षिण सोलापूर भाजपा तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्ह्याचे नेते हनुमंत कुलकर्णी, आणि होटगी स्टेशनचे कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे सरपंच  तथा किसान मोर्चाचे पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड   यांनी अतिशय सक्रिय राहून किसान मोर्चा चे विचार गावागावात पोहोचवण्यासाठी यंत्रणा उभी करणार असल्याचे सांगितले. 

यावेळी बोलताना शशिकांत देशमुख म्हणाले की, किसान मोर्चा हा शेतकऱ्यांचा आवाज  बनला पाहिजे.शेतकरी हाच या देशाचा मालक असल्यामुळे शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू सुरू करून खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना न्याय दिला आणि यापुढेही शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी किसान मोर्चा कार्यरत राहील. किसान मोर्चाचे पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा होटगी स्टेशनचे विकास प्रिय सरपंच जगन्नाथ गायकवाड म्हणाले की, " भारत हा शेतीप्रधान देश असून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठीच आपण जिल्हा किसान मोर्चाच्या माध्यमातून काम करत असून शेतकऱ्यांच्या मागण्या आणि अडचणी सोडवण्यासाठी आपला दरवाजा कायम खुला असून सर्वसामान्य शेतकरी हेच या देशाचे खऱ्या अर्थाने दैवत असल्याने त्यांच्यासाठी काम करणे हे मी माझे भाग्य समजतो. 

उपाध्यक्ष : - महेश पाटील,  उमेश मळेवाडी, मुरारी शिंदे अण्णासाहेब पाटील रसूल मुलाणी, यशवंत नरोटे... सरचिटणीस : - शंकर घाडगे ,विश्वास  चव्हाण, सुरेश बगले, बाळाप्पा जक्कापुरे,  घनश्याम गरड, बाळासाहेब जाधव ,बाळासाहेब पाटील... चिटणीस  : - प्रकाश कोरे ,हनुमंत पुजारी ,खंडाप्पा वग्गे, शरद डोईफोडे,  प्रथम मल्लाव, श्याम गोडसे,  दिगंबर कावळे,  विकास बिराजदार,  नंदकुमार विभुते ,प्रकाश मोहोळकर... प्रसिद्धीप्रमुख ::-संजय शिंदे, सोशल मीडिया : - विठ्ठल काळे, सोशल मीडिया संयोजक: - आजिनाथ ताटे सोशल मीडिया प्रमुख: - प्रकाश बिराजदार  आधी सह सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments