श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळयासाठी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 13, 2024

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळयासाठी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी

 श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळयासाठी

रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):-   ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रण नियम 2000 नुसार दि. 18 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिवजयंतीच्या पुर्व संध्येला  श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळयासाठी ध्वनीची कायद्याने विहित केलेली मर्यादा पाळून सकाळी 6.00 वाजल्यापासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी परवानगी दिली आहे.सोलापूर जिल्हयासाठी सन 2024 मधील सण-उत्सव इत्यादी करीता ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी वेळेत सूट देणेबाबत आदेश पारीत केलेले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग क्र.3 अन्वये सन 2024 या वर्षामध्ये दि.18 फेब्रुवारी 2024 या दिवशी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा सोहळा हा भारतीय सैन्यात सेवा बजावत असताना देशासाठी धारातिर्थी पडलेल्या शहीद जवानांच्या वीर माता, पत्नी, वीर कन्या यांच्या हस्ते हा पाळणा सोहळा केला जातो. याकरिता सकाळी 06.00 वाजल्यापासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सुट देण्याबाबत विनंती केल्याने. दि.18 फेब्रुवारी 2024 या दिवशी सकाळी 06.00 वाजल्यापासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सुट देण्यात आली आहे.

ध्वनीची विहित मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा  वापर करावा. सदरची सूट शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू राहणार नाही. याची दक्षता घ्यावी असेही आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages