Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आणि त्यांच्यामुळे समाजातील दलाल संपले : दास शेळके (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा)

 मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आले आणि त्यांच्यामुळे समाजातील दलाल संपले 

-: दास शेळके (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा)

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाने जीआर काढून बहुतांश मराठ्यांचा ओबीसी आरक्षणातील मार्ग मोकळा केला. त्यामुळे मराठा समाजातील जवळपास 80 टक्के कुटुंबांना कुणबी दाखले मिळतील. लग्न जमविताना ज्यांची-ज्यांची सोयरीक होते त्या सर्व मराठ्यांना कुणबी दाखले मिळतील. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांच्या सर्व मागण्या महाराष्ट्र शासनाने सरकारने पूर्ण केल्या याबद्दल त्यांचेही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आभार मानले. सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला जय भवानी जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विजय असो यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

मराठा समाजाप्रती प्रामाणिक व्यक्तीच्या पाठीमागे समाज ठामपणे उभा राहतो याचं उदाहरण म्हणजे मनोज चरांगे पाटील हे आहेत. त्यांच्या योग्य भूमिकेमुळे समाजाला न्याय मिळाला त्यांच्यामुळे समाजातील दलाल संपले असे म्हणत शासनाचे अभिनंदन करत निर्णयाचे स्वागत मराठा क्रांती मोर्चा ज्येष्ठ समन्वयक दास शेळके आणि सुनील रसाळे यांनी केले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक श्रीकांत घाडगे, लता फुटाणे, शेखर फंड, फारुक शेख, रसून पठाण, राजाभाऊ कुसेकर, प्रशांत बाबर, नितीन चव्हाण, बाबा शेख, बजरंग जाधव, कृष्णा थोरात, निलेश शिंदे, विशाल फुटाणे, अनिल म्हस्के, संजय घाडगे, निलेश शिंदे, दत्ता खलाटे, अक्षय शिंदे, युवराज शेळके, संभाजी शितोळे, निरंजन नवघिरे, यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments