गाडे गुरुजी
भऊ - आमचे आजोबा
नातवाच्या आयुष्यातील आजोबा पहिला मित्र असतो ,
आजोबांच्या आयुष्यातील नातू हा शेवटचा मित्र असतो !
भावनेच्या पलीकडचे जग आणि मायेच्या पलीकडची काळजी ,
करणारा देव माणूस म्हणजे आमचे आजोबा !
शिक्षकी पेशा असून सर्व भूमिका पार पाडणाऱ्या आजोबांस साष्टांग नमस्कार !
संकटांच्या भवसागरात तरुण जाणारा बाप मी पाहिला !
शेवटच्या क्षणातही नातीसाठी डोळ्यातून पाणी वाहणारे आजोबा मी अनुभवले !
शब्दातही न सांगता येणारे कर्तुत्व !
निशब्द करून जाणारे नेतृत्व !
आज एक वर्ष पूर्ण झाले ,
आंम्हाला सोडून गेलात .
पहाडसारखे आमचे आजोबा होते !
एखादया वटवृक्षा सारखे चारित्र्य त्यांचे !
स्वतः ऊनात राहून ऊनाचे चटके सोसावे !
समोरच्याच्या अंतःकरणास न दुखवावे !
अशी शिकवण माझ्या आजोबांची होती !
इतिहास त्यांच्या आवडीचा विषय
आम्हांवर त्यांच्याच संस्कारांचा "आशय "
आमच्या आजोबांनी आम्हाला ' खरा तो एकचि धर्म ' शिकवला !
म्हणूनच आमच्यावर शिव - शंभूंचे संस्कार झाले !
आत्तापर्यंत साने गुरुजी आम्हांला पुस्तकातून समजले ,
पण गाडे गुरुजी (भऊ - आमचे आजोबा ) आम्ही साक्षात अनभुवले !
मयुरी बाबर - ९११२४४३३४३
करकंब

0 Comments