पोखरापूर ग्रामपंचायतीने लेंगरेवस्ती शाळेत बोअर पंप बसवून केली पाण्याची सोय
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंगरेवस्ती पोखरापूर शाळेत ग्रामपंचायत पोखरापूर यांचे मार्फत संपूर्ण बोअर संच बसवून देण्यात आला. शाळेत बसविण्यात आलेल्या बोअर पंपाचे पुजन व उद्धघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सानिका नरुटे सरपंच ग्रामपंचायत पोखरापूर व प्रमुख पाहुणे आदर्श ग्रामसेवक मा.कैलास मोरे पॅनलप्रमुख मा.हर्षदभैय्या दळवे हे उपस्थित होते. दादा चव्हाण यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले.राजेंद्रकुमार वाघमोडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळेसाठी ग्रामपंचायत पोखरापूरने केलेल्या कामाची माहीती सांगितली व शाळेच्या सर्वांगीण विकास,गुणवत्ता वाढ साठी विविध उपक्रम याची माहीती दिली. यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थित सौ.सानिकाताई यांनी बोअरचे पूजन केले. मा.दत्ताभाऊ खंदारे सदस्य यांचे शुभहस्ते बोअर मोटार सुरू केली. मा.कैलास मोरे यांनी यापुढेही शाळेसाठी ग्रामपंचायत सर्व सहकार्य करेल असे सांगितले.सदस्य अंकुश दळवे,दत्ता खंदारे व ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांनी मोटार पंप आणणे व बसविणे यासाठी खुप प्रयत्न केले. त्या बद्दल त्यांचा व सरपंच मा.सानिका बालाजी नरूटे, उपसरपंच आशिषबापू आगलावे,सदस्य मा.अंकुश दळवे, मा.दत्ता काकडे, बजरंग लेंगरे, पॅनलप्रमुख मा.हर्षद दळवे आणि आदर्श व कर्तव्यदक्ष ग्रामसेवक कैलास मोरे यांचे शाळेतर्फे सत्कार करून सर्वच ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानण्यात आले, यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रम लेंगरे, उपाध्यक्ष दिलीप लेंगरे,सदस्य तात्या शिंगाडे व सदस्या आश्विनी लेंगरे, बिराप्पा लेंगरे,द्रोणाचार्य लेंगरे,द्वारकेष लेंगरे,आप्पा लेंगरे,गणेश लेंगरे, किरण लेंगरे,छाया शिंगाडे, रतन शिंगाडे, मंगल म्हमाणे व सर्व पालक, माता पालक, शिक्षण प्रेमी उपस्थित होते.


0 Comments