प्रतिनिधी जर प्रामाणिक कार्य करत असेल व तो सामान्य व्यक्ती असला
तरी त्याला जनशक्तीचा पाठींबा मिळतोच
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सन्माननीय मनोज जरांगे यांचा लढा मराठा समाजाला हक्क देण्यासाठी यशस्वी झाला आहे . यासाठी कोट्यवधी मराठा समाज धैर्याने प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी एकीने सर्व स्तरातून खंबीरपणे उभा राहिला.तेही शांततेत सर्व नियमांचे पालन करत.हे मराठा समाजाचं यश कौतुकास्पद आहे. प्रतिनिधी जर प्रामाणिक कार्य करत असेल व तो सामान्य व्यक्ती असला तरी त्याला जनशक्तीचा पाठींबा मिळतोच आणि सरकार दरबारी त्यांची दखल घ्यावी लागते. हे मराठा आरक्षण मोर्चाने सिद्ध केले आहे. निर्मळ,निर्मम भावनेने. नियोजनबद्ध रीतीने लोकांच्या वेदना समजून समाज व राष्ट्रकार्य करायला हवं हा संदेश मा.जरांगे पाटील यांनी दिला आहे. " छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा विचार केला, तसा आजच्या काळातही जो कोणी जनसामान्यांच्या बरोबर न्यायी व प्रामाणिक कार्याने असतो त्यास कोणत्याही परिस्थितीत जनाधार हा मिळतोच मिळतो.तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी राजे सारखे प्राण गेला तरी बेहत्तर पण राष्ट्र व मनुष्यधर्म पाळण्याची त्यागी वृत्ती हवी." हा खूप मोलाचा संदेश मा.जरांगे पाटील व त्यांच्या सर्व मावळ्यांनी व त्यांच्याबद्दल सहसंवेदना असणाऱ्या समाजांनेही दिला आहे.
प्रोफेसर डॉ.सौ. सुवर्णा चव्हाण- गुंड
मराठी विभाग प्रमुख, माऊली महाविद्यालय वडाळा.उ.सोलापूर

0 Comments