माऊली महाविद्यालय, वडाळा येथील मराठी विभागाने ,' मराठी भाषा
संवर्धन पंधरवडा १४-२८ जानेवारी पंधरवड्याच्या निमित्ताने विविध
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 'साहित्यवेल ' या दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या भित्तीपत्रकाचं अनावरण करुन माऊली महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन अध्यक्ष काकासाहेब साठे, अँड राजतिलक डांगे, प्राचार्य डॉ शिरीष भोसले व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते केले. मुख्य म्हणजे कथाकार राजेंद्र भोसले यांनी ,' महिला सरपंच ' या कथेचं कथाकथन केले .जेष्ठ कवी मारुती कटकधोंड यांच्या कवितेने युवकांची मन जिंकून घेतली. विद्यार्थीनींनी कवितांचं सादरीकरण केले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गझलकार बदीउज्जमा बिराजदार यांनी आपल्या गझलांनी वातावरण मराठीमय करून कार्यक्रम एका उंचीवर नेला.त्यानंतर जोड लाभली ती प्राचार्या डॉ नसीमा पठाण यांच्या प्रबोधनपर कविता व व्याख्यानाची. कार्यक्रमाचे आयोजन, प्रस्तावना सुत्रसंचलन कवयित्री प्रो.डाॅ.सौ.सुवर्णा चव्हाण - गुंड यांनी केली.तर आभार प्रा.परमेश्वर हटकर यांनी मानले.याप्रंगी बहुसंख्येने विद्यार्थी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments