जैन गुरुकुलच्या ओजस फटालेने तयार केला 'Antisleep Glass'
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद सोलापूर आयोजित ५१वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच ज.रा.चंडक प्रशाला बाळे येथे संपन्न झाले. यामध्ये श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सातवीचा विद्यार्थी ओजस ओमप्रकाश फटाले याने विज्ञान शिक्षक संजय भस्मे यांच्या मार्गदर्शनाने सादर केलेल्या 'अॅन्टीस्लीप ग्लास' या उपकरणाने तृतीय क्रमांक प्राप्त केला व त्याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली. या संशोधित उपकरणामुळे चालकाला गाडी चालवताना झोप लागल्यास बजर वाजतो त्यामुळे तो व इतर लोकही सावध होतात त्यामुळे पहाटे होणारे जास्तीत-जास्त अपघात टाळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित एच. गांधी व सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक आशितोष शहा, उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक राजकुमार काळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

0 Comments