लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर महायुतीची बैठक संपन्न
14 जानेवारी रोजी महायुतीचा मेळावा जामगुंडी मंगल कार्यालयात होणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- होऊ घातलेल्या लोकसभा निवङणुकांच्या अनुषंगाने साईप्रसाद हॉटेल येथे महायुतीची बैठक पार पङली. या बैठकीमध्ये 14 जानेवारी रोजी महायुतीच्या होणाऱ्या मेळाव्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली . महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी माहितीच्या वतीने रणनीती आखण्यास सुरुवात झाल्या असून त्याची ही नांदी असल्याचे खासदार डॉ.जयसिदधेश्वर महास्वामी यांनी सांगितले.
या बैठकीसाठी समन्वयक तथा विदयमान आमदार साचिन कल्याणशेट्टी,आमदार यशवंत माने,नरेंद्र काळे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,शहाजी पवार,महेश साठे,कल्याणराव काळे,धैर्यशील मोहीते -पाटील,विक्रम देशमुख,
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे ,दिलिप कोल्हे ,मा.गटनेते किसन जाधव ,मनोज शेजवाळ,राजेंद्र हजारे ,जमिर शेख ,अजित कुलकर्णी ,महेश निकंबे ,आनंद मुस्तारे ,प्रमोद भोसले ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिङीया शहराध्यक्ष वैभव गंगणे,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,RPI गटाचे सुशिल सरवदे ,अतुल नागटिळक,शिवम सोनकांबळे ,रुषी घोलप ,यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी [अजित दादा गट] ,भाजपा ,शिवसेना,रयत क्रांती ,सदाभाऊ खोत गट ,RPI आठवले गट ,प्रहार ,शिवसंग्राम यांचे सर्वच प्रमुख पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत येणाऱ्या निवङणुकांच्या अनुषंगाने येत्या १४ जानेवारीला दुपारी ३ वा. सोलापूरात महायुतीचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.महायुतीचे शक्तीप्रदर्शन या मेळाव्यात पहावयास मिळणार आहे.या वेळी महायुतीतील सर्वच घटक पक्षातील नेते मंङळींनी आपली मनोगते व्यक्त केली.
मागील हेवेदावे ,मतभेद बाजूला सारुन आपण सर्वांनी एकसंघाने मिळून काम करु व विरोधकांना आपली ताकद या माध्यमातून दाखवून देऊ अशा प्रतिक्रिया या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या



0 Comments