Hot Posts

6/recent/ticker-posts

कोरेगाव-भीमा प्रकरण फडणवीस यांना साक्षीला बोलवावं

 कोरेगाव-भीमा प्रकरण फडणवीस यांना साक्षीला बोलवावं

मुंबई (कटूसत्य वृत्त):- कोरेगाव भीमा चौकशी आयोगाच्या सुनावणीत  पोलिसांचा जो घोळ आहे त्यावर सुनावणी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही साक्षीला बोलवावं, अशी आमची मागणी आहे. याबाबत पोलिसांना रितसर इनपूट असतानाही वेळीच खबरदारी का घेतली नाही. असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केला. प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उलट तपासणीसाठी उपस्थित होते.  यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधानांच्या इच्छेनुसार 22 तारखेला देशभरातील भा.ज.पा. गोरगरिबांना रामाच्या नावानं दिवाळी साजरी करता यावी, यासाठी आता शासनानेच हजार रूपयाचं रितसर अनुदान द्यावे,  अशी मी मागणी करतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Reactions

Post a Comment

0 Comments