वैराग शहर आणि तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात...!
आरक्षणाच्या लढाईत वैराग पंचक्रोशीतील 57 गावे सक्रिय....!!
मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध....!!!
वैराग (कटू सत्य वृत्त):-गेल्या 40 वर्षापासून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यभरातून आरक्षणासाठी रात्रीचा दिवस करून लढा उभा करणाऱ्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांना समर्थन देण्यासाठी वैराग शहर आणि तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात झाली असून या साखळी उपोषणामध्ये प्रचंड संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी होत आहेत.
"आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं" , " एक मराठा लाख मराठा" " कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही" अशा प्रकारच्या गगनभेदी घोषणा देत सकल मराठा समाज बांधवांनी वैराग परिसर दणाणून सोडला. मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे .या प्रखर मागणीसाठी मराठा समाजाच्या वेदना आणि आशीर्वाद घेण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील लवकरच मोहोळ आणि वैराग या ठिकाणी पाचवा टप्प्यात सभा घेणार असल्यामुळे मराठा समाजातील बांधवांमध्ये प्रचंड चैतन्य पसरले आहे.
यावेळी आपली प्रतिक्रिया देताना डॉ. कपिल कोरके म्हणाले, " तीन राज्यात सत्ता आल्यानंतर भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी अंतरवाली सराटी येथे आरक्षण स्थळी जाऊन मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द दुसऱ्या राज्यात सत्ता आल्याने अचानकपणे फिरवला. त्यामुळे सकल मराठा समाज बांधवांनी महाजन आणि भुजबळ यांचा तीव्र निषेध केला असून सरकारने 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्यास मराठा समाजाची ताकद काय असते हे सकल मराठा समाज दाखवून देईल . प्रत्येक वेळी सकल मराठा समाजाच्या बांधवांनी सरकारच्या मागण्यांना सन्मानाने साथ दिली असून आता मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता सरकारने ताबडतोब मराठ्यांना आरक्षण द्यावे. अन्यथा मराठा समाज या नेत्यांना कात्रज चा घाट दाखवल्याशिवाय सोडणार नाही. दुष्काळाचे सावट पडल्यामुळे वैराग आणि वैराग भागातील 57 गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सध्या वैराग या ठिकाणी साखळी उपोषण सुरू असून यामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी होत असल्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या वेदना लक्षात घ्याव्या. मराठा समाज पेटल्यानंतर काय होतं हे 24 तारखेच्या नंतर सरकारच्या लक्षात येईल कारण मराठा समाज हा एक शांत आणि संयमी दिसत असला तरी क्षत्रिय असल्यामुळे तलवार कधी आणि कुठे चालवायची हे त्याला चांगलं कळतं. त्यामुळे सरकारने साडेसहा कोटी च्या पुढे संख्या असणाऱ्या सकल मराठा समाज बांधवांच्या मागणीचा ताबडतोब विचार करावा अन्यथा त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील . असा स्पष्ट इशारा यावेळी डॉ. कपिल कोरके यांनी दिला आहे.
या साखळी उपोषणामध्ये अरुण सावंत मेंबर, आंबेगावचे सरपंच सुशील दळवे, वैराग पंचायत समितीचे माजी सभापती मकरंद निंबाळकर, सुर्डीचे सरपंच विनायक डोईफोडे, तडवळे चे माजी सरपंच बाळासाहेब आवारे, समाधान गुंड, आनंद कोरके, सुभाष सुरवसे ,परमेश्वर पौळ, संदीप पाटील, बाळासाहेब मोरे, आयुब पठाण ,दादासाहेब लोखंडे, रामचंद्र भालशंकर, धनराज आवारे, सचिन ताटे,, हरिश्चंद्र पौळ, समाधान पवार, मनोज वाघमारे, शुभम सावंत ,आनंद डुरे आदी बांधवासह वैराग शहर आणि परिसरातील बहुसंख्य सकल मराठा समाज बांधवांनी या उपोषणात सक्रिय सहभाग घेतला आहे.

0 Comments