Hot Posts

6/recent/ticker-posts

शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला दिनांक 17, 18, आणि 19 डिसेंबर रोजी अँम्फी थिएटर मध्ये होणार.......!

 शेठ लोणकरणजी चंडक स्मृती व्याख्यानमाला  दिनांक 17, 18, आणि 19

 डिसेंबर रोजी अँम्फी  थिएटर मध्ये  होणार.......! 

सोलापूर (कटू सत्य वृत्त): - ज्या मातीत आपला जन्म झाला.  त्या मातृभूमीसाठी आपण काहीतरी देणे लागतो .या उदात्त भावनेतून स्वर्गीय लोणकरणजी  चंडक यांनी सोलापुरात लोककल्याणकारी आणि सात्विक भावनेतून काम केले. त्यांनी अवघ्या समाजाला आपले कुटुंब मानले. त्यांचे स्फूर्तीदायी स्मरण समाज प्रबोधनाच्या माध्यमातून होत राहावे यासाठीच त्यांचे नातू किशोर चंडक आणि त्यांचे पुत्र डॉ.गिरीश चंडक  गेल्या 26 वर्षापासून ही व्याख्या मला सोलापुरात चालवत असून यंदाचे 27 वे वर्ष असल्याची माहिती   डॉ.श्रुतीश्री वडगबाळकर डॉ.  गिरीश चंडक यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना  डॉ.  वडगबाळकर  म्हणाल्या की, " वेचोनिया  धन उत्तम व्यवहारे  /  उदास विचारे वेच करी"  या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे शेठजींनी आपले सात्विक जीवन व्यतीत केले. सचोटीने व्यापार करताना समाजातील अडचणीचा त्यांनी प्रत्येक वेळी  विचार केला .आणि विश्वस्त निधीतून सर्वांगीण समाज उपयोगी कामे केली. लहानपणीच त्यांच्यावर प्रखर राष्ट्रभक्तीचे संस्कार आणि बाळकडू मिळाल्यामुळे ते महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाने भारावून गेले होते. आयुष्यभर त्यांनी खादी वस्त्र परिधान केले. त्यांचे शिक्षण जास्त झालेले नव्हते तरीदेखील ते उत्कृष्टपणे सफाईदार इंग्रजी बोलत.  त्याचबरोबर मराठी, मारवाडी, हिंदी, गुजराती आणि कन्नड या भाषा सुद्धा ते अस्खलितपणे बोलत असत. 

सोलापूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पंधरा वर्षे नगरसेवक म्हणून अतिशय प्रभावी काम केले. भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळी नगरपालिकेचे ते अध्यक्ष होते ही योगायोगाची आणि भाग्याची बाब म्हणावी लागेल. त्याच्या अध्यक्षीय कालावधीतच सोलापूरला टाकळी येथून भीमा नदीचे पाणी पुरवठा सुरू करण्याबद्दल चा पहिला प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला. अशाप्रकारे संपूर्ण आयुष्यभर समाज हेच कुटुंब मानुन त्यांनी आपले आयुष्य वेचले. 

त्यांचे स्फूर्तीदायी स्मरण समाज प्रबोधनाच्या माध्यमातून अखंडपणे होत राहावे .याच उदात्त आणि विधायक विचारधारेतून  गेल्या 26 वर्षापासून व्याख्यानमालेची परंपरा लोणकरण जगन्नाथ चंडक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. यंदाच्या वर्षी अतिशय महत्त्वाच्या विषयावर तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून यंदाचे व्याख्यानमालेचे 27 वे वर्ष आहेदिनांक 17 डिसेंबर रोजी हैदराबाद येथील विद्याजी देवधर  " कायदे निर्मितीमध्ये स्त्रियांचे योगदान"  या विषयावर समाजाचे प्रबोधन करणार आहेत. दिनांक 18 डिसेंबर रोजी" महाराणी ताराबाई:  वाटचाल आणि राजनैतिक धोरण" या विषयावर सातारा येथील राजेंद्र घाडगे दुसरे पुष्प व्याख्यानमालेचे गुंफणार आहेत. दिनांक 19 डिसेंबर रोजी सोलापूर येथील गोविंद काळे " पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासन या विषयावर सविस्तरपणे बोलणार आहेत. ही सर्व व्याख्यानमाला हिराचंद नेमचंद वाचनालयाचे एमपी थेटर मध्ये सायंकाळी सहा ते आठ या वेळेत होणार आहे.  आजवर या व्याख्यानमालेला श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. ही व्याख्यामाला म्हणजे सोलापूरकरांना पर्वणीच आहे.चोखंदळ रसिकांना मिळालेली ही मेजवानी सोलापूरकरांनी अवश्य घेण्यासाठी उपस्थित राहावे . 

या व्याख्यानमालेचा नागरिक,  बंधू आणि भगिनी तसेच  सोलापूर शहरातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या तिन्ही शाखा सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहून श्रवणानंद घ्यावा, असे आवाहन चंडक  ट्रस्टचे किशोर चंडक, आणि सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ.  श्रुतीश्री वडगबाळकर यांनी केले आहे.   

या पत्रकार परिषदेला कार्याध्यक्ष किशोर चंडक, समन्वयक एडवोकेट जे.  जे.  कुलकर्णी, डॉ.  गिरीश चंडक, मारुती कटकधोंड,  मालती बंग आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments