अविष्कार २०२३-२४ स्पर्धेत बार्शीच्या सोजर फार्मसी काॅलेजचे घवघवीत यश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- २६ नोव्हेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी,लोणेरे आयोजित राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेची क्षेत्रीय (झोनल) फेरी इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अँड रिसर्च बी फ़ार्म तळेगाव या ठिकाणी झाली. यामध्ये सोलापूर आणि पुणे विभागातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या महाविद्यालयातील संशोधक स्पर्धक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेमध्ये सोजर कॉलेज ऑफ फार्मसीमधील अंतिम वर्ष बी.फार्मसीच्या विवेक चव्हाण यांनी " मेडिसिन आणि फार्मसी डिसिप्लिन" मधून तृतीय ( ब्राँझ मेडल ) क्रमांक पटकावला तसेच कॉमर्स अँड मॅनेजमेंट डिसिप्लिन" अंतिम वर्षांच्या आनंद भागवत यांने द्वितीय क्रमांक ( सिल्व्हर मेडल ) व तृतीय वर्ष बी.फार्मसी मधील मुस्कान जिकरे हिने " तृतीय क्रमांक ( ब्राँझ मेडल ) पटकावला. या विद्यार्थ्यांना प्रा. सागर जाडकर यांनी मार्गदर्शन केले. या यशामुळे सोजर फार्मसीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. या विद्यार्थ्यांची निवड युनिव्हर्सिटी लेवल राऊंडला झालेली आहे. ही स्पर्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे, रायगड येथे होणार आहे. अविष्कार स्पर्धा" नेहमीच नाविन्यपूर्ण संशोधनास प्राधान्य देते. या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी सोजर फार्मसी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते. येथील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग दर वर्षी नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करून त्या प्रत्यक्षात उतरवणयासाठी अहोरात्र मेहनत घेतात. प्रा. सागर जाडकर यांनी विशेष परिश्रम करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर केलेच पण सदर स्पर्धेत यश मिळवण्यासाठी आविष्कार समन्वयक म्हणुन यशस्वीरित्या आपली जबाबदारी पार पाडली. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य सुजित करपे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच प्रा. जाडकर यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच संस्थाध्यक्ष अरुण (दादा) बारबोले, यांनी महाविद्यालयाला मिळालेल्या या अभुतपुर्व यशाबद्दल सर्वांचे कौतुक केले.
0 Comments