सकारात्मक विचार व कृती दोन्ही अत्यंत गरजेचे-डिक पाराशीनी
*सिंहगड महाविद्यालयात "सदैव सकारात्मक जीवन" विषयावर व्याख्यान संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जीवनात आनंदी राहण्यासाठी नुसता सकारात्मक विचार करून चालत नाही तर सकारात्मक कृती देखील करावी लागते.आनंदी होणे आणि यशस्वी होणे यांत फरक आहे.यशस्वीतेचि व्याख्याच व्यक्तिसापेक्ष आहे, आपल्याला नेमून दिलेले काम आपण चोख पार पाडत असू तरी देखील आपण यशस्वी ठरलो असे म्हणता येईल. आपल्या जन्माचा उद्देशच काहीतरी सकारात्मक कृती करण्यासाठीच आहे तो पूर्ण करण्यासाठी सकारात्मक आयुष्य जगणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय वक्ते तथा लाईफ इज ऑल पॉझिटिव्ह' फौंडेशन चे संस्थापक डिक पाराशीनी(दुबई, यूएई) यांनी केले.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय केगाव येथे आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य. डॉ. शंकर नवले, सीआरटीडी चे डायरेक्टर व माजी कुलगुरू डॉ.एस. एच. पवार, स्टुडंट डेव्हलपमेंट अँड करिअर कौंसेलिंग सेल चे समन्वयक प्रा. एस. एस. हिप्परगी, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. रवींद्र देशमुख उपस्थित होते.
विद्यार्थी दशेमध्ये भेडसावणारे प्रश्न, करिअरचे नियोजन,सभाधीटपणा, ताणतणाव नियोजन, प्रेम, आकर्षण आदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना पाराशीनी यांनी समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा. एस. एस. हिप्परगी यांनी स्टुडंट डेव्हलपमेंट व करिअर कौंसेलिंग सेल चा उद्देश स्पष्ट केला व विद्यार्थ्यांसाठी विविध ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केले जात असल्याचे विशद केले.
या व्याख्यानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या विविध सत्रांत श्रावणी नवले, सृष्टी नवले, अरशीन नदाफ, प्राजक्ता पोळ, वेदिका चांदोडे या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले. प्रा. रवींद्र देशमुख यांनी आभार व्यक्त केले.
0 Comments