Hot Posts

6/recent/ticker-posts

विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचली सोलापूर शहरात ; महापालिकेचे आयुक्त शीतल तेली -उगले यांच्या हस्ते झाले उदघाटन*

 विकसित भारत संकल्प यात्रा’ पोहचली सोलापूर शहरात ; महापालिकेचे आयुक्त शीतल तेली -उगले  यांच्या हस्ते झाले उदघाटन

15 दिवसात सोलापूर शहरात 32 ठिकाणी रथाच्या माध्यमातून  सरकारच्या योजना घेऊन पोहचेल यात्रा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शासनाच्या विविध विभागांच्या प्रमुख योजना  समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात तसेच या योजनेपासून वंचीत राहिलेल्या पर्यंत हा लाभ पोहचावा यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम  सोलापूर शहरात राबविली जाईल.यासाठी शासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी सहकार्य करणार आहे.  शहरी भागासाठी नगर विकास विभाग समन्वयक म्हणून काम करणार आहेत. ह्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी महानगरपालिकेला सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले  यांनी केले.

    या यात्रेच्या रथांना महापालिकेचे आयुक्त  यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून या ' विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त विद्या पोळ, उपायुक्त मच्छिंद्र घोलप,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले,मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे वाहन अधीक्षक नागनाथ मेंडगुळे  उपस्थित होते.

    या मोहिमेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनेंतर्गत पात्र असलेल्या, परंतु अद्यापपर्यंत प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत या योजना पोहचविणे, या योजनाच्या माहितीचा प्रसार आणि योजनाबद्दल जागृती निर्माण करणे, या योजनांच्या अंमलबजावणीबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांचे अनुभव व सूचना जाणून घेणे हे या 'विकसित भारत संकल्प यात्रे'चा मुळ उद्देश आहे. सोलापूर महानगरपालिकेचे विविध विभाग यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी,महिला व बालकल्याण विभाग, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,परिवहन विभाग,आरोग्य विभाग 

घनकचरा व्यवस्थापन विभाग इत्यादी व प्रत्येक विभागा कडून प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित राहणार असून अभियानाबाबत  माहिती देणार आहेत तसेच त्या ठिकाणी फॉर्मही भरून घेतले जाणार आहेत. या अभियानाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली.

Reactions

Post a Comment

0 Comments