राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर छापे
सात आरोपींना अटक
मुळेगाव तांडा (कटूसत्य वृत्त):- राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुळेगाव तांडा येथील हातभट्ट्यांवर धाडी टाकून सात गुन्ह्यात 100 लिटर हातभट्टी दारू व 21 हजार दोनशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायनासह पावणे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सविस्तर वृत्त असे की, सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 7 नोव्हेंबर मंगळवारी पहाटेच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून या छापा कारवाईत एकूण सात गुन्हे नोंदविले आहेत. प्रभारी दुय्यम निरीक्षक ब 1 विभाग उषाकिरण मिसाळ यांनी मुळेगाव तांडा येथे शालाबाई सुरेश जाधव, वय 54 वर्षे हीच्या ताब्यातून 3400 लिटर रसायनासह 77 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. मानसी वाघ दुय्यम निरीक्षक सीमा तपासणी नाका यांच्या पथकाने अमोल भोजू पवार, वय 27 वर्षे याच्या ताब्यातून 2800 लिटर रसायन, 30 लिटर हातभट्टी दारू व अक्षय टोपू चव्हाण, वय 28 वर्षे याच्या ताब्यातून 2600 लिटर रसायन जप्त करुन जागीच नाश केले. भरारी पथकाचे प्रभारी निरिक्षक सुरेश झगडे यांच्या पथकाने जगदंबा मंदिर मुळेगाव तांडा येथील अनिल दामू राठोड, वय 45 वर्षे याच्या हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून त्याच्या ताब्यातून तीन हजार लिटर रसायन व दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे यांनी त्यांचे पथकासह सुनिता गोविंद राठोड, वय 46 वर्षे या महिलेच्या ताब्यातून 2150 लिटर रसायन व 30 लिटर हातभट्टीची दारू असा पन्नास हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच निरिक्षक ब विभाग सदानंद मस्करे यांच्या पथकाने देसू येमलू राठोड, वय 55 वर्षे याच्या ताब्यातून 3800 लिटर रसायन व 40 लिटर हातभट्टी दारू व सविता आकाश चव्हाण, वय 29 वर्षे या महिलेच्या ताब्यातून 3500 लिटर रसायन जप्त करुन जागीच नाश केला. एका अन्य कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक राहुल बांगर व दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांचे पथकाने सोलापूर शहरात दत्त नगर परिसरात सायंकाळी पाळत ठेवून लेसू बाबू चव्हाण, वय 67 वर्षे या इसमाला त्याच्या दुचाकी क्र. MH13 BZ 5416 वरुन रबरी ट्यूबमध्ये 120 लिटर हातभट्टी दारु वाहतूक करतांना अटक केली असून त्याच्या ताब्यातून छप्पन हजार दोनशे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण आठ गुन्हे नोंदवले असून आठ आरोपींना अटक केली असून पाच लाख त्रेचाळीस हजार सहाशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सदानंद मस्करे, राहूल बांगर, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, अक्षय भरते, मानसी वाघ, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, अलीम शेख, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अण्णा कर्चे, प्रशांत इंगोले, अशोक माळी, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी, वाहनचालक रशिद शेख व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.
आवाहन,
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.
0 Comments