Hot Posts

6/recent/ticker-posts

पवनराजे राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावला

पवनराजे राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावला


 मोहोळ (कटूसत्य वृत्त): अमरावती येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत मोहोळ येथील राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेच्या पवनराजे विक्रमसिंह थोरात याने १७ वर्षाखालील वयोगटात सुवर्णपदक मिळविले. त्याची राष्ट्रीय स्तरावरील धनुर्विद्या स्पर्धे साठी राज्य संघात निवड झाली आहे प्रशालेच्या ३९ वर्षाच्या इतिहासात राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवण्याची किमया प्रथमच या खेळाडूने केली आहे..यावेळी अरण येथे संपन्न झालेल्या विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झालेल्या अवधूत रामदास गरगडे याचाही सन्मान करण्यातआला. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक रामचंद्र माने व संदीप गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments