कन्हेरगाव ग्रामपंचायतीवर लिंबाजी मोरे साहेब गटाचा आठ जागा मिळवून दणदणीत विजय ..... .....
.......सरपंच पदी श्रीकांत बनसोडे विजयी ......
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील प्रतिष्ठित असलेल्या कन्हेरगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत 81 वर्षाचे शेलार मामा लिंबाजी मोरे साहेब यांच्या दिनदलित कष्टकरी आघाडीने सरपंच पदासह अकरापैकी आठ जागावर विजय मिळवला तर येथील पत्रकार गटाच्या कन्हेरसिद्ध ग्रामविकास पॅनलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले., लिंबाजी मोरे गटाचे श्रीकांत निवृत्ती बनसोडे हे 200 हून अधिक मतांनी सरपंच पदावर विजयी झाले, त्यांनी कन्हेरसिद्ध गटाच्या संजय नवनाथ आगलावे यांचा पराभव केला. लिंबाजी मोरे दिनदलीत कष्टकरी आघाडीचे विजयी उमेदवार याप्रमाणे..... लिंबाजी नागनाथ मोरे, सारिका संतोष शिंदे, कोमल शशिकांत लोंढे ,गणेश नीलकंठ माने, पद्मजा विठ्ठल मोरे, समाधान विठ्ठल चव्हाण, योगेश माणिक खोचरे व अनिता विजय माने तर कन्हेरसिद्ध पॅनलचे तीन विजयी उमेदवार... वनिता बाळासाहेब डोके, सुधीर महादेव मोरे व सोनाली सुशांत केदार .
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे 81 वर्षाचे सेवानिवृत्त अभियंता लिंबाजी मोरे साहेब यांनी स्वतंत्र पॅनल व सरपंच पदाचा उमेदवारासहित निवडणूक रिंगणात उडी घेतली व जनतेच्या प्रचंड पाठिंब्यावर परिवर्तन घडवून आणले व सरपंच पदासह आठ जागी विजय मिळवून ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली. विरोधी कन्हेरसिद्ध सत्ताधारी पॅनलने मतदारांना अनेक प्रकारचे आमीष व प्रलोभने दाखवली व "लक्ष्मी"ची वारे माप उधळण केली पण जनतेने मात्र मतपेटीतून 'दूध का दूध पानी का पानी' करून दाखवले म्हणून कन्हेरगाव ची निवडणूक माढा तालुक्यात व टेंभुर्णी परिसरात खुमारसदार चर्चेचा विषय बनली आहे.
0 Comments