पिंपळनेर ग्रामपंचायत निवडणुकीत डांगे गटाचे वर्चस्व.....
... सरपंचपदी अनुजा डांगे विजयी....
निमगाव( टे.) च्या कन्येला मीळाला पिंपळनेरच्या सरपंच पदाचा मान....
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्याचे लक्ष असलेल्या पिंपळनेर ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाले असून ग्रामदैवत श्री खंडोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनलने सरपंच पदासह 13 पैकी दहा जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे.सरपंच पदाच्या चौरंगी लढतीत जिल्हा परिषद चे माजी सदस्य संजय डांगे यांच्या पत्नी अनुजा संजय डांगे या 409 मतांनी विजयी झाल्या आहेत. सत्ताधारी पिंपळनेर ग्राम विकास आघाडीचे प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव सतीश पाटील व ग्रामदैवत खंडोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनल स्वर्गीय रामहरी दादा डांगे गट यांच्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या दुरंगी लढतील डांगे गटाने 10 जागांवर तर पाटील गटाने तीन जागावर विजय मिळवला. विशेष म्हणजे विजयी डांगे गट आणि पराभूत पाटील गट हे दोन्हीही आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे व रणजीत भैय्या शिंदे यांना मानणारे गट आहेत.
सरपंच पदाच्या थेट निवडणुकीत एकूण 3869 मतदानापैकी अनुजा डांगे यांना 1988 तर पाटील गटाच्या माजी सरपंच रेखा हनुमंत जाधव यांना 1579 मते मिळाली उर्वरित उमेदवार सोमनाथ जमदाडे यांना 227 विक्रम फुगे यांना 68 तर नोटासाठी सात मते मीळाली. सकाळी दहा वाजता निवडणूक निकाल हाती येताच पॅनल प्रमुख बिभीषण डांगे ,संजय डांगे यांच्यासह समर्थकांनी फटाके फोडून आणि गुलालाची मुक्तपणे उधळण करून एकमेकांना मिठाई भउरून आनंद व्यक्त केला.
प्रभाग वार विजयी उमेदवार व मिळालेली मते पुढील प्रमाणे..... प्रभाग क्रमांक एक ...अभिजीत शारंगर काशीद( ५००) पल्लवी राहुल गोडसे (499) सविता विजयकुमार लोंढे (418)... प्रभाग क्रमांक दोन.. सतीश व्यंकोजी पाटील (401) शोभा हनुमंत कापरे (440 )अश्विनी जयवंत काशीद( 429).. प्रभाग क्रमांक तीन... मनोजकुमार विनायक पाटील (319) साधना धनाजी मखरे (332) ... प्रभाग क्रमांक चार... नितीन विठ्ठल भोगे (382) विजया बिभिषण साडेकर (360 ) ...प्रभाग क्रमांक पाच... अमित आण्णा खंडाळे (645) औदुंबर मच्छिंद्र लोंढे (603) वैशाली दीपक लोंढे पाटील (661)
निमगाव (टे) च्या कन्येला पिंपळनेरच्या सरपंच पदाचा मान
.....विशेष असे की पिंपळनेर ग्रामपंचायत सरपंच पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सौ. अनुजा संजय डांगे या आमदार बबनदादा शिंदे यांच्या निमगाव( टे.) या गावच्या कन्या आहेत, येथील प्रतिष्ठित नागरिक मधुकरनाना गरड यांच्या त्या कन्या आहेत व बेंबळे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय रामहारी डांगे ,पिंपळनेर यांच्या त्या धर्मपत्नी आहेत., आज निमगाव च्या कन्येला पिंपळनेरच्या सरपंच पदाचा मान मिळाला आहे ,त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Comments