Ads

Ads Area

सकल मराठा समाजाने केला भुजबळांचा निषेध.

सकल मराठा समाजाने केला भुजबळांचा निषेध.

मराठा व ओबीसी समाजामध्ये विष पेरण्याचे काम छगन भुजबळ हे करत आहेत - माऊली पवार

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- एकेकाळी शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ख्याती असलेले छगन भुजबळ यांचा मराठा समाजाला अभिमान वाटायचा. वीस आमदारासह फुटून  सेनेशी गद्दारी करत ,काँग्रेसमध्ये सामील होणारे आणि काँग्रेस मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले आणि सध्या फक्त सत्तेच्या लालशेसाठी भाजप सरकार मध्ये नामदार बनलेल्या छगन भुजबळानी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम करू नये असे मत सकल मराठा समाजाची समन्वयक माऊली पवार यांनी व्यक्त केले.

पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या छगन भुजबळ यांनी मराठा व ओबीसी समाजामध्ये भांडणे लावण्याचा जो घाणेरडा प्रकार केला आहे. त्याचा सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

पुढे बोलताना माऊली पवार म्हणाले की,

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडणारे चार पैकी तीन मंत्री हे ओबीसी समाजाचे होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून, पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे आत्मबलिदान देणारा आमचा बांधव विलास क्षीरसागर हा माळी समाजाचा होता. मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून मार्डी, तालुका उत्तर सोलापूर येथे आमरण उपोषण करणारा संजय खरटमल हा आमचा बांधव ढोर (SC) समाजाचा आहे. याचा विसर भुजबळांना पडला आहे का? . एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलगा असलेला मनोज जरांगे पाटील हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक आरक्षण मागणीसाठी गांधीवादी मार्गाने आमरण उपोषण करताना..... तुमच्या सरकारची दोन महिन्यात दोन वेळा दाना दान उडवून टाकली आहे...... मराठा क्रांती मोर्चाची पवित्र चळवळ बदनाम करण्याचा आपण विडा उचललेला आहे का? बीडमध्ये तुम्ही म्हणता ओबीसींची घरे आणि दुकाने जाळली. त्या पेक्षा जास्त घरे व दुकाने मराठा समाजाच्या नेत्यांची जाळली आहेत..... तुमची पोटदुखी ही आहे की मराठा समाजाने फुगीर ओबीसी आरक्षण हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व समाजातील लोक आज मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला एकमुखी पाठिंबा देत आहेत.. मनोज जरांगे पाटील यांनी कधीही जाळपोळ, तोडफोड याचे समर्थन केलेले नाही.  आपण महाराष्ट्रातल्या राजकारणातले एक ज्येष्ठ नेते आहात. तुमचं हे वागणं बरं नव्हे. तुमच्या या मराठाद्रोही वागण्याचा जाहीर निषेध मी व माझा  सकल मराठा समाज करत आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close