Hot Posts

6/recent/ticker-posts

सत्तेसाठीच शिवसेनेचे झाले दोन भाग, कट्टर शिवसैनिकांच्या डोक्यात प्रचंड राग

 सत्तेसाठीच शिवसेनेचे झाले दोन भाग, कट्टर शिवसैनिकांच्या डोक्यात प्रचंड राग




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अन्याय विरुद्ध लढण्यासाठी मुंबई या ठिकाणी शिवसेना या पक्षाची स्थापना करून मराठी माणसाचा आवाज बुलंद केला. रस्त्यावर लढणाऱ्या माणसांना शिवसेना आपली वाटू लागली. शिवसेनाप्रमुख  या गरीब आणि रस्त्यावर लढणाऱ्या माणसांना आपले वाटू लागले. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या करिश्माने सत्ता नसताना या सरकारला अनेक वेळा झुकविले.अनेक निर्णय प्रचंड ताकतीने घेतल्यामुळे शिवसैनिक मोठ्या ताकतीने काम करू लागले त्यातूनच रस्त्यावर लढणारी पोरं आमदार झाली नामदार झाली.  मुख्यमंत्री पदापर्यंत गेली.शिवसेना मराठी मातीतला पक्ष... मराठी माणसाच्या आणि मराठीच्या न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुखांनी उभा केलेल्या या पक्षाची केवळ सत्तेसाठी आणि अहंकारा पोटी दोन भाग झाले.आज शिवसेनाप्रमुख असते तर हे गद्दार निर्माण झाले नसते. परंतु शांत आणि संयमी असणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून केवळ ईडीच्या भीतीपोटी आणि सत्तेच्या हव्यासापाई अनेकांनी मूळ शिवसेनेला धोका देत आमचीच शिवसेना आणि आम्हीच शिवसेनेत अशा प्रकारचं कातड पांघरून हे लोक गुवाहाटी मार्गे मुख्यमंत्री झाले, कोणालातरी लाल दिव्याची गाडीही मिळाली.राजकीय पक्षातील आमदार किंवा सदस्य इकडून तिकडे बेडकाप्रमाणे उड्या मारतात हे महाराष्ट्राला नवीन नाही. परंतु सर्व पक्षच फोडून आम्हीच शिवसेना हे मात्र कधीच घडलं नव्हतं ते शिवसेनाप्रमुख हयात नसताना घडतंय याचंच दुःख शिवसैनिकांना होत आहे.शिवसैनिक आणि मराठी माणसांच्या वेदना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलेल्या नाहीत.  हेच फार मोठं आजवर ते शिवसेनेत काम करत असल्याचे त्यांचं अपयश म्हणावं लागेल.केवळ शिवसेनेची माती करण्यासाठी भाजपा त्यांचा वापर करतोय हे अगदी सर्वसामान्य गावातल्या,  खेड्यातल्या शिवसैनिकाच्या लक्षात आलं.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हे लक्षात येत नसेल..?सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये विस्तव ही जाताना दिसत नाही. या दोन्ही पक्षातील नेत्यांची एकमेकांवर आग पाखड सुरू आहे.एकमेकांच्या उखाळ्या पाखळ्या आणि चिखल फेक करण्यातच दोन्ही पक्षांचा वेळ जात असून भाजपा मात्र आपला पक्ष मानण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे.या दोन्हीही गटाच्या शिवसेना नेत्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे एक म्हण आहे दोघांच्या भांडणांमध्ये तिसऱ्याचा लाभ होतो.आणि ही भांडणाची सुवर्णसंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळेच भाजपाला मिळाली. असे शिवसैनिकांचे स्पष्ट मत आहे.गेल्या काही दिवसापासून दोन्हीही गटातील शिवसेनेत एकमेकांच्या अंगावर धावून जात असून तुंबळ हाणामाऱ्या सुरू होऊ लागले आहेत.मुंब्रा येथील शाखा पाडणे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवतीर्थावरील अभिवादन यातून ते साऱ्या देशाने पाहिले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ही सत्तेसाठी असेच दोन तुकडे झाले आहेत.मराठी माणसांच्या प्रश्नासाठी झगडणारे हे पक्ष आणि हे नेते आता स्वतःच एकमेकांशी संघर्ष करत बसल्यामुळे याचा फायदा भाजपा घेण्याची दाट शक्यता आहे.भाजपाने शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अर्थातच मराठी विरुद्ध मराठी असा संघर्ष उभा केल्यामुळे राज्यातील अ मराठी मंडळीं च्या चेहऱ्यावर कमळ फुलले आहे.मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अन्यायाविरुद्ध लढणारी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर खिळखिळा होऊ लागलेली पाहून सच्चा शिवसैनिक दुःखी झाला आहे.केवळ सत्ता टिकवण्यासाठी आणि पुढची सत्ता आणि मालमत्ता जतन करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदराव दिघे यांचे फोटो आणि भाषणात यांचीच नावे घेऊन शिंदे गट आमची शिवसेना खरी असल्याचे खोटे सांगत आहेत.शिवसेना कोणाची आहे हे अगदी लहान मुलाला सुद्धा माहित आहे.तरीसुद्धा केवळ सत्तेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाचे कमळ आता धरून धनुष्यबाण मोडण्याचा प्रयत्न करत आहेत.अबू आझमी तसेच ओवेसी यांच्या विरोधात मराठी माणूस हिंदुत्वाची पताका घेऊन लढत होता. आणि आज ही लढण्याची गरज असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा विचार करून एकत्र आलं तरच मराठी माणूस आणि मुंबई टिकणार आहे.शिवसेना आणि मराठी माणूस यांचं नातं अतिशय जिव्हाळ्याचं असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर शिवसेनेमध्ये भांडण निर्माण झाल्यास त्याचा फायदा परप्रांतीय घेतील आणि मराठ्यांच्या उरावर बसतील. हा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून पुन्हा एकदा शिवसेना एकत्रितरणाचे प्रयत्न करावेत आणि मराठी माणसांच्या वेदना लक्षात घ्याव्यात. अशी मागणी राज्यातील आणि मुंबई भागातील तमाम शिवसैनिकांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments