Hot Posts

6/recent/ticker-posts

गलेलठ्ठ पगारामुळं अधिकार्‍यांची चंगळ, जिल्हा परिषदेचा कारभार भोंगळ

 गलेलठ्ठ पगारामुळं अधिकार्‍यांची चंगळ, जिल्हा परिषदेचा कारभार भोंगळ



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या विविध मिळणाऱ्या योजनांना ब्रेक लागला आहे.सरकार ट्रिपल इंजिन असल्यामुळे प्रशासनाकडे लक्ष देण्यासाठी या सरकारला वेळ नाही. याच सुवर्णसंधीचा फायदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला असून याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

शेतकऱ्यांचे मंदिर म्हणून गावा- गावात जिल्हा परिषदेला ओळखले जाते. या जिल्ह्यातला शेतकरी स्वतःची भाकरी बांधून सकाळी कामासाठी घर सोडतो.  आणि जिल्हा परिषदेमध्ये दिवसभर थांबतो.
आणि रात्री शेवटी काम न झाल्यामुळे हात हलवतच शेतकऱ्यांना घराकडे परतावे लागते. सोलापूर जिल्हा परिषदेत कामासाठी जिल्ह्यातून अनेक नागरिक  रोज ये -जा करतात. मात्र गलेलठ्ठ पगार घेणारे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या कामांना न्याय देत नसून मोबाईल आणि ज्या कामांमध्ये मालपाणी आहे अशीच कामे अधिकारी करू लागल्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याची फार मोठी फसवणूक होत आहे. कर्मचारी सक्तीच्या रजेवर गेल्यामुळे आणि कामे रखडल्यामुळे नागरिकांमधून नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे गेल्या महिन्यापासून जिल्हा परिषद प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दबाव न पडल्यामुळे त्यांना लगाम घालण्यासाठी कोणी वाली राहिला नाही.

निष्क्रियता आणि मनमानी, गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढत आहे.दर शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालय सुरू असतानाही केवळ मनमानी आणि सुट्टी घेण्याचा सगळ्यांचाच फंडा असल्यामुळेच कामासाठी आलेल्या नागरिकांना मात्र थंडा थंडा घेऊनच परतीचा प्रवास करावा लागतोय. अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आले असले तरी त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही त्यामुळे कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे

Reactions

Post a Comment

0 Comments