Ads

Ads Area

२० नोव्हेंबर ते २० डिसेंबर महारेशीम अभियान

 २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर महारेशीम अभियानशाश्वत उद्योगासाठी शेतकऱ्यांनी जास्तीचा लाभ घ्यावा
जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांचे आवाहन


कुरुल (कटूसत्य वृत्त):-  रेशीम व त्यापासून मिळणाऱ्या शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहीती व्हावी याकरीता प्रचारगाठी तसेच आगामी वर्षात तुती लागवड नाव नोंदणी करण्यासाठी २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर पासून राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार असून हे अभियान सोलापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. शाश्वत उत्पन्नासाठी या संधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी विनीत पवार यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आजअखेर सोलापूर जिल्हयात ७२५ शेतकऱ्यांनी ८५५ एकर क्षेत्रामध्ये तुती लागवड केलेली असून यात वाढ होण्यासाठी महारेशीम अभियान च्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले जाणार आहे. जिल्हात उत्तरोत्तर तुती लागवडीत वाढ होत आहे. तरी वर्ष २०१७ पासून राबविल्या गेलेल्या महारेशीम अभियानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रेशीम उद्योगाची प्रचार व प्रसिध्दी होवून रेशीम उद्योग लोकाभिमूख होण्यासही मदत मिळाली आहे. यात प्रशासकीय यंत्रणेसोबतच कृषी क्षेत्रात असलेल्या कार्यरत यंत्रणा, जिल्हा परिषद यांच्या मार्फत व रेशीम लागवडीतून आधिकाअधिक उत्पन्न मिळविणाऱ्या शेतकऱ्यांची मदत घेतली जाणार असल्याचे सांगून शासन निर्णयानुसार मनरेगा योजना अंतर्गत एकरी रु.३ लाख ९७ हजार ३३५ रुपये व सिल्क समझ-२ अंतर्गत एकरी रु. ३७५०००/- अनुदान मिळणार आहे.

कृषी व वनसंपत्तीवर आधारीत रोजगाराचे प्रचंड क्षमता असलेला रेशीम उद्योग असून महाराष्ट्रातील हवामान याला पोषक आहे. कृषी विकास दर वृध्दी बरोबरच ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिकस्तर व जिवनमान उंचविण्यास मदत करणारा हा उद्योग आहे. यातून हमखास व नियमीत उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल ही वाढत चालला आहे. हीच बाब लक्षात घेवून एकात्मीक व शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ ते २०२८ या वस्त्रोद्योग धोरण कालावधीत रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थ व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

हिरज येथे रेशीम कोष बाजारपेठ

मौजे हिरज, ता. उ. सोलापूर येथील कोष खरेदी विक्री बजारपेठ इमारतीचे बांधकाम पुर्ण झाली आहे. लवकरच कोष खरेदी बजारपेठ कार्यान्वीत होणार आहे. तरी रेशीम उद्योग करणेकरीता नोंदणीसाठी मा. रेशीम विकास अधिकारी श्रेणी-1, जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर मोजे हिरज, ता. उ. सोलापूर, तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना संपर्क साधावा असे आवाहन विनित सुरेश पवार रेशीम विकास अधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close